शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र सुरूच : ओम प्रकाश कोहली; पुणे विद्यापीठात ‘ज्ञानसंगम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:33 PM2017-11-04T15:33:32+5:302017-11-04T15:41:18+5:30

बिटीशांनी त्यांच्या राजवटीत भारतीय शिक्षणाचे युरोपीकरण करण्यास सुरूवात केली. दुर्दैवाने शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र आजही सुरूच आहे, अशी खंत गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांंनी व्यक्त केली.

Conspiracy of European culture of education continues: Om Prakash Kohli | शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र सुरूच : ओम प्रकाश कोहली; पुणे विद्यापीठात ‘ज्ञानसंगम’

शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र सुरूच : ओम प्रकाश कोहली; पुणे विद्यापीठात ‘ज्ञानसंगम’

Next
ठळक मुद्देप्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्ञानसंगम चर्चासत्रदेश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी शिक्षण अजूनही पारतंत्र्यातच : ओम प्रकाश कोहली

पुणे : बिटीशांनी त्यांच्या राजवटीत भारतीय शिक्षणाचे युरोपीकरण करण्यास सुरूवात केली. शिक्षणाशी जोडली गेलेली संस्कृती व परंपरेची नाळ तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुर्दैवाने शिक्षणाच्या युरोपीकरणाचे षडयंत्र आजही सुरूच आहे. देश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी शिक्षण मात्र अजूनही पारतंत्र्यातच आहे, अशी खंत गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांंनी व्यक्त केली. शिक्षणाचे भारतीयकरण करण्याचे आव्हान स्वीकारून त्यादृष्टीने दिशा निश्चित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित ‘ज्ञानसंगम’ या दोन दिवसीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष प्रा. अनिरूध्द देशपांडे, मंचचे प्रांत संयोजक हरिभाऊ बिरासदार, संयोजक प्रा. आनंद लेले, जे. नंदकुमार व्यासपीठावर उपस्थित होते. ‘भारतीय शैक्षणिक परंपरेमध्ये राष्ट्रबोध आणि वर्तमान संदर्भ’ हा या चर्चासत्राचा विषय आहे. 
कोहली म्हणाले, मुस्लिम राजवटी सुमारे हजार वर्षांच्या काळात देशातील लोकांनी केवळ राजकीय पराभव स्वीकारला होता. पण केवळ केवळ १९० वर्षांच्या ब्रिटीश राजवटीमध्ये लोकांनी राजकीय पराभवाबरोबरच मानसिक पराभवही स्वीकारला. देशाला ७० वर्ष स्वातंत्र्य मिळूनही आपण या मानसिक पराभवातून बाहेर पडलो नाही. महात्मा गांधी यांची पुर्ण स्वराज्याची कल्पना आज दिसत नाही. ‘स्व’ म्हणजे आपली परंपरा ज्या राज्यामध्ये प्रतिबिंबित होते ते ‘स्वराज्य’ त्यांना अपेक्षित होते. त्यासाठी शिक्षणाला आपली संस्कृती व परंपरेशी जोडण्याची गरज आहे. हे करत असताना ते कालानुरूप असायला हवे. आधुनिक आव्हानांना सामोरे जाण्यासही हे शिक्षण सक्षम असावे. युरोपीय शिक्षणामुळे हिनता बोध निर्माण झाला. मुल्यांचा र्‍हास होण्याबरोबरच आपण परंपरेपासून वेगळे झालो.
भारत हा सर्वसमावेशक देश आहे. हा देश सर्वांना सोबत घेवून पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो. देशाची संस्कृती आणि परंपरेतच हे मुळ आहे. पाश्चिमात्य देशांसारखा संकुचित नाही. मात्र, अद्याप आपण राष्ट्राची दिशा, राष्ट्रदर्शन निश्चित करू शकलो नाही, असे मत डॉ. कृष्ण गोपाळ यांनी व्यक्त केले. डॉ. करमळकर यांनी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सर्वांना समान शिक्षण देणे हे देशासमोरील आव्हान असल्याचे सांगितले. बिरासदार यांनी प्रास्ताविक केले. 

Web Title: Conspiracy of European culture of education continues: Om Prakash Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.