पुण्यात काँग्रेसची उमेदवार कोंडी; नेत्यांमध्येच मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:35 PM2019-03-29T12:35:09+5:302019-03-29T12:39:16+5:30

अरविंद शिंदे यांनी बुधवारी रात्री उमेदवारी मिळाल्याचे सत्कार स्विकारल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात एकदाही त्यांच्या नावाची पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नाही.

Congress candidate confusion ; problems in among leaders | पुण्यात काँग्रेसची उमेदवार कोंडी; नेत्यांमध्येच मतभेद

पुण्यात काँग्रेसची उमेदवार कोंडी; नेत्यांमध्येच मतभेद

Next
ठळक मुद्देउमेदवारांमध्ये आघाडीवर असलेल्या एका नेत्याने थेट दिल्लीपर्यंत फोन करून व्यक्त केली तीव्र नाराजी आता अरविंद शिंदे यांच्याबरोबरीने माजी आमदार मोहन जोशी यांचेही नाव घेतले जात आहे.

पुणे: प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर होऊनही काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नसल्याने काँग्रेसची उमेदवार कोंडी झाल्याची टीका होत आहे. नेत्यांमधील मतभेदांमुळेच उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असल्याचे समजते. बुधवारी रात्री अरविंद शिंदे यांनी उमेदवारी मिळाल्याचे सत्कार स्विकारल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात एकदाही पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नाही. रात्री उशिरापर्यंत शिंदे पक्के  आहेत की बदल होणार अशी शंका खुद्द काँग्रेस कार्यकर्तेच व्यक्त करत होते.
बुधवारी रात्री शिंदे यांनी काँग्रेसभवनमध्ये उमेदवारी मिळाल्याचे सत्कार स्विकारण्यास सुरूवात केली. याचा पक्षातंर्गत कानोसा घेतला असता त्याचवेळी इच्छुक उमेदवारांमध्ये आघाडीवर असलेल्या एका नेत्याने थेट दिल्लीपर्यंत फोन करून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली. त्यात महापालिकेतील २९ नगरसेवकांची संख्या थेट ९ वर आणल्याचे हे बक्षिस आहे का अशी विचारणा करण्यात आली. जातीवर आधारीत उमेदवारी देत असाल तर मग त्यांच्यामागे त्यांचा किती समाज आहे ते तरी स्पष्ट आहे का असा आक्षेप नोंदवण्यात आला. त्यामुळे केंद्रीय निवड समितीच्या सदस्यांची चलबिचल होऊन उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्याचे लांबवण्यात आले असे काही काँग्रेसजनांचेच म्हणणे आहे. 
शुक्रवारीही दिवसभरात पुण्यातील काही जुन्या पदाधिकाºयांनी राज्य तसेच दिल्लीत फोनाफोनी करून शिंदे यांच्या उमेदवारीबद्धल नाराजी व्यक्त केली. पक्षाने केंद्रीय स्तरावरून नियुक्त केलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल यांना हे फोन करण्यात आल्याचे समजले. निरीक्षक या नात्याने त्यांनी केंद्रीय निवड समितीच्या अन्य सदस्यांना याची माहिती दिली. राज्यस्तरावरील एका नेत्याने शिंदे यांचे नाव लावून धरले, मात्र त्या नेत्याबाबतही केंद्रीय नेतृत्त्व नाराज असल्यामुळे त्यांना किती महत्व द्यायचे असा प्रश्न समितीच्या सदस्यांसमोर निर्माण झाला व पक्षश्रेष्ठींनाच याचा निर्णय घेऊ द्यावा असे ठरवण्यात आले. त्यामुळे काही सदस्यांनी पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांना याबाबत सुचित करण्याची जबाबदारी घेतली असल्याची माहिती मिळाली. ते शुक्रवारी दिवसभरात या सदस्यांना उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यामुळेही निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला.
दरम्यान आता शिंदे यांच्याबरोबरीने माजी आमदार मोहन जोशी यांचेही नाव घेतले जात आहे. त्याचबरोबर पक्षात नसलेले मात्र तरीही उमेदवारीची मागणी केलेले प्रविण गायकवाड यांचीची चर्चा पुन्हा सुरू असल्याची माहिती मिळाली. उमेदवाराचे नाव अखेरपर्यंत गुप्त ठेवायचे या काँग्रेस परंपरेशी अनुसरूनच हे सर्व चालले असल्याचे प्रतिक्रिया एका काँग्रेस कार्यकर्त्याने याबाबत लोकमत बरोबर बोलताना व्यक्त केली. 

Web Title: Congress candidate confusion ; problems in among leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.