निवडणुकीवरून संमेलनाध्यक्षांचा परस्परविरोधी सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 02:03 AM2018-12-19T02:03:36+5:302018-12-19T02:04:04+5:30

डॉ. अरुणा ढेरे, डॉ. प्रेमानंद गज्वी यांची मुलाखत : पुरस्कार हा कलाकृतीचा सन्मान

The conclave of the conference of drama president | निवडणुकीवरून संमेलनाध्यक्षांचा परस्परविरोधी सूर

निवडणुकीवरून संमेलनाध्यक्षांचा परस्परविरोधी सूर

googlenewsNext

पुणे : ‘निवडणूक प्रक्रियेमुळे अनेक मान्यवर क्षमता असूनही या पदापासून वंचित राहिले आहेत. यंदा एकमताने अध्यक्ष निवडून आणला ही चांगली सुरूवात आहे, असे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांनी सांगताच ‘देशाचा पंतप्रधान जर लोकशाही पद्धतीने निवडून दिला जातो तर मग संमेलनाध्यक्ष का निवडू नये? हे साहित्य परिषदेच्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे अशी विरोधी भूमिका नियोजित नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी मांडली.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाची निवडणूक लोकशाही पद्धतीने कि सन्मानाने व्हावी, यावर डॉ. अरूणा ढेरे आणि साहित्य संमेलनाध्यक्षाचे उमेदवार राहिलेले नियोजित नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांनी एकाच व्यासपीठावर परस्परविरोधी सूर आळविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. निमित्त होते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. अरूणा ढेरे आणि डॉ. प्रेमानंद गज्वी यांच्या सत्कार सोहळा आणि मुलाखतीचे. डॉ. मनोहर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नांना ढेरे आणि गज्वी यांनी समर्पक उत्तरे देत कार्यक्रम रंगवला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ललित कला केंद्राचे प्रवीण भोळे, मराठी विभागाचे तुकाराम लोमटे आणि सतीश आळेकर उपस्थित होते.

कविता म्हणजे अवघड वाड्:मय प्रकार
डॉ. अरूणा ढेरे यांनी वडिल डॉ. रा.चिं ढेरे यांच्या काही आठवणी उलगडल्या. कवितेबद्द्ल सांगताना त्या म्हणाल्या, कविता ही सर्वात अवघड वाडमय प्रकारापैकी एक आहे. कारण यात कमीत कमी शब्दातं जास्तीत जास्त गोष्टी सांगायच्या असतात. त्यामुळे सगळ्यात सोपी वाटणारी पण सगळ्यात अवघड असणारी कविता असते.
प्रेमानंद गज्वी यांनी सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेल्या ‘छावणी’ या आपल्या नाटकाबददल आपली बाजू स्पष्ट केली. या नाटकातील काही संदर्भ देत त्यांनी आजच्या परिस्थितीवर भाष्य केले. ‘जातिव्यवस्था हे आपल्याकडचे सर्वात दुखणे आहे. त्यामुळे सगळ्याच जातींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या आणि पूर्णच देशच आरक्षित करून टाका अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. मी मनोरंजनवादी, प्रयोगशील आणि विचारवादी असे तीन प्रकारचे साहित्य मानतो. तसेच दलित साहित्याने दलितांचा फारसा फायदा झाला नाही उलट बाबासाहेबांची चळवळ आपण मागे नेली असे गज्वी म्हणाले. पुरस्कार वापसीबदद्ल बोलताना डॉ. ढेरे आणि गज्वी दोघांनीही या कृतीला विरोध दर्शविला.
‘पुरस्कार हा आपल्या कलाकृतीचा सन्मान आहे. तो परत करून आपण कोणाचा निषेध करतो? ज्यांनी पुरस्कार जाहीर केला त्यांचा की ज्यांच्या काळात पुरस्कार परत करत आहोत त्या सरकारचा? याचा विचार करायला हवा याकडे गज्वी यांनी लक्ष वेधले.

Web Title: The conclave of the conference of drama president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे