'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत पुणे जिल्ह्यातील 50 तक्रारींची सुनावणी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 06:29 PM2017-08-22T18:29:10+5:302017-08-22T18:29:50+5:30

महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत आज पुणे येथे जनसुनावणी घेण्यात आली.

Complete hearing of 50 complaints in Pune district under 'Women's Commission' | 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत पुणे जिल्ह्यातील 50 तक्रारींची सुनावणी पूर्ण

'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत पुणे जिल्ह्यातील 50 तक्रारींची सुनावणी पूर्ण

googlenewsNext

पुणे ,दि. 22 - महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत आज पुणे येथे जनसुनावणी घेण्यात आली.  यावेळी आयोगाकडे दाखल झालेल्या पुणे जिल्ह्यातील 50 तक्रारींची सुनावणी घेण्यात आली.  

आयोगाकडे दाखल असलेल्या 24 तसेच 26 नव्या तक्रारी अशा एकूण 50 तक्रारीवर सुनावणी घेण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली. रहाटकर यांच्याशिवाय, वकील, पोलीस अधिकारी, समुपदेशक, महिला बाल विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पुणे, पिंपरी चिंचवड मधील दाखल तक्रारींची सुनावणी, समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाली. कोल्हापूर येथे अशाच प्रकारे महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी घेऊन 60 तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली होती. कोल्हापूर येथील सुनावणीत विभक्त होण्याच्या मार्गावर असलेली 4 जोडपी समुपदेशनानंतर पुन्हा एकमताने संसारात रमली. 

पुणे विभागात कोल्हापूर आणि पुणे अशा दोन ठिकाणी स्वतंत्र सुनावणी,समुपदेशन करून महिला आयोगाने अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या सर्व तक्रारीवर कार्यवाही केली आहे. पुणे विभागातील फेब्रुवारी 2016 पासून दाखल सर्व तक्रारींवर सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबत बोलताना आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, महिला आयोग आपल्या दारी सारख्या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या दारीच न्याय मिळत आहे. आणि त्यामुळेच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील फेब्रुवारी 2016 पासूनच्या तक्रारींबाबत 'झिरो पेंडनसी' झाली. 

Web Title: Complete hearing of 50 complaints in Pune district under 'Women's Commission'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.