मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:53 PM2018-06-16T15:53:29+5:302018-06-16T15:53:29+5:30

राज्यातील जुन्नर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे एकमेव आमदार शरद भिमाजी सोनवणे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

complaint filed against MNS MLA Sharad Sonawane | मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा : महिला पोलिसांवर दबाव  सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे यांनी केली तक्रार  

पुणे  : राज्यातील जुन्नर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे एकमेव आमदार शरद भिमाजी सोनवणे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार शंकर भवारी यांनी माहिती दिली.  गुरूवारी ( दि.१५) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान आळेफाटा पोलिस ठाणे येथे आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे या काम करत होत्या. त्यावेळी जुन्नर विधानसभा मतदार संघाचे आमदार शरद भिमाजी सोनवणे यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याची बेकायदशीर रेशनिंगच्या गव्हाची वहातूक करणारी पिकअप जिप पकडून रितसर कारवाई केल्याचा राग मनात धरला. आणि  पोलिस स्टेशनला जमविलेल्या ४० ते ५० लोकांसमोर व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसमक्ष डमाळे यांना अर्वाच्य भाषेत अपमानीत केले. 

      शासकीय काम करत असताना दबाब आणून शासकीय कामापासून परावृत्त केल्याच्या कारणावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे यांनी आमदार शरद भिमाजी सोनवणे यांच्या विरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन आमदार शरद सोनवणे यांच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क.३५३,५०९,१८६,२९४ अन्वये रितसर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरिक्षक दयानंद गावडे करत आहेत.

Web Title: complaint filed against MNS MLA Sharad Sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.