पुणे शहरातील आरक्षण बदलाबाबत आमदार गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 04:30 PM2018-08-23T16:30:09+5:302018-08-23T16:43:56+5:30

सामाजिक व शहराचे हित लक्षात घेऊनच आरक्षण बदलाबाबत निर्णय घ्यावा : निलम गोऱ्हे

Complaint to chief ministerabout changing reservation in Pune city by MLA Gorhe's | पुणे शहरातील आरक्षण बदलाबाबत आमदार गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

पुणे शहरातील आरक्षण बदलाबाबत आमदार गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

Next
ठळक मुद्देकधी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे तर कधी रस्त्याच्या आखणीचे कारणे देत ही प्रक्रिया सुरूमंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात बदल करणे व तेही आरक्षणात हे अत्यंत अयोग्य

पुणे : शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील कोथरूड, बाणेर, मुंढवा येथील आरक्षणे बदलली जात असल्याबद्दल आमदार निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा केली आहे. 
कोथरूड, बाणेर, मुंढवा ही शहराची उपनगरे आहेत. कोथरूड हे तर आता शहराचे केंद्रस्थान होत चालले आहे. तिथे  शाळा, मैदाने, दवाखाने, उद्याने यांची आत्यंतिक गरज आहे. हे लक्षात घेऊनच उद्यान, अग्निशमन केंद्र, प्राथमिक शाळा यासाठी आरक्षणे ठेवण्यात आली होती. आता काही ना काही कारणे दाखवून ही आरक्षणे रद्द करण्याचा प्रयत्न होत असल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले आहे. 
विधानसभेच्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, तसेच या तिन्ही क्षेत्रातील आरक्षणे उठवण्याबाबत प्रक्रिया सुरू केली गेली असल्याचेही दिसते आहे. कधी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे तर कधी रस्त्याच्या आखणीचे अशी कारणे देत ही प्रक्रिया सुरू केली आहे. हरकती सूचना यांची सुनावणी घेऊन मंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात बदल करणे व तेही आरक्षणात हे अत्यंत अयोग्य असल्याचे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.
सामाजिक हिताबरोबरच शहराचे हित सुध्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी अन्य जागा मिळू शकते. राज्य सरकार त्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकते. रस्त्याची आखणी करणेही सरकारच्याच अखत्यारीतील गोष्ट आहे. त्यांना विरोध नाही, मात्र त्यासाठी आरक्षणात बदल करणे चुकीचे आहे. त्यामुळे सामाजिक व शहराचे हित लक्षात घेऊनच आरक्षण बदलाबाबत निर्णय घ्यावा, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे. 

Web Title: Complaint to chief ministerabout changing reservation in Pune city by MLA Gorhe's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.