भिडेगुरुजींच्या विराेधात विश्रामबाग पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 07:31 PM2018-06-13T19:31:30+5:302018-06-13T19:33:55+5:30

संभाजी भिडेगुरुजी यांच्या अांबे खाऊन मूल हाेत असल्याच्या वक्तव्याच्या विराेधात जादुटाेणा विराेधी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज अखिल पत्रकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल जगताप यांनी विश्रामबाग पाेलीस ठाण्यात दिला अाहे.

Complaint application at Vishrambagh Police Station against bhideguruji | भिडेगुरुजींच्या विराेधात विश्रामबाग पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज

भिडेगुरुजींच्या विराेधात विश्रामबाग पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज

Next

पुणे : संभाजी भिडे यांच्या आंब्याबाबतच्या व्यक्तव्यावरून त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा तक्रार अर्ज अखिल पत्रकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जगताप यांनी विश्रामबागवाडा दिला आहे. 


    नाशिक येथील सभेत बोलताना माझ्या बागेतील आंबे खाल्याने मूल होत असल्याचा अजब दावा संभाजी भिडे यांनी केला होता. तसेच हा आंबा आपण 180 जोडप्यांना दिला होता त्यातील 150 जोडप्यांना मूल झाले असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर विविध माध्यमातून टीका झाली. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनेही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांचे वक्तव्य तपासून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 


    अाज विश्रामबाग पाेलीस स्टेशनमध्ये अखिल पत्रकार सुरक्षा संघच्या प्रदेशाध्यक्ष सुनिल जगताप यांनी भिडेगुरुजींच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा तक्रार अर्ज दाखल केला. अर्जामध्ये संभाजी भिडे यांचे वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे असून ते अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहे असे म्हंटले आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे सामान्य लोकांचा शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यांवरील विश्वासाला तडा जाण्याचा धाेका निर्माण केला असल्याचे  म्हंटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. 
 

Web Title: Complaint application at Vishrambagh Police Station against bhideguruji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.