खेर यांच्यासमोर वाचला अडचणींचा पाढा, अभ्यासक्रमा बाबत तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 02:43 AM2018-07-12T02:43:10+5:302018-07-12T02:43:23+5:30

एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी संस्थेत ‘एंट्री’ घेताच आर्ट, साऊंड आणि सिनेमॅटोग्राफी विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात येणाऱ्या अडचणींचा त्यांच्यासमोर पाढा वाचला. विद्यार्थ्यांना नियोजनासाठी अभ्यासक्रम वेळेत उपलब्ध न होणे, प्राध्यापकांकडून विषय योग्य पद्धतीने शिकविले न जाणे, कॅमेºयाच्या लेन्स महागड्या असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना हाताळण्यास नकार देणे अशा विविध तक्रारी विद्यार्थ्यांनी खेर यांच्याकडे केल्या.

 Complain about Kher, read the issue and complain about the curriculum | खेर यांच्यासमोर वाचला अडचणींचा पाढा, अभ्यासक्रमा बाबत तक्रारी

खेर यांच्यासमोर वाचला अडचणींचा पाढा, अभ्यासक्रमा बाबत तक्रारी

Next

पुणे - एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी संस्थेत ‘एंट्री’ घेताच आर्ट, साऊंड आणि सिनेमॅटोग्राफी विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात येणाऱ्या अडचणींचा त्यांच्यासमोर पाढा वाचला. विद्यार्थ्यांना नियोजनासाठी अभ्यासक्रम वेळेत उपलब्ध न होणे, प्राध्यापकांकडून विषय योग्य पद्धतीने शिकविले न जाणे, कॅमेºयाच्या लेन्स महागड्या असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना हाताळण्यास नकार देणे अशा विविध तक्रारी विद्यार्थ्यांनी खेर यांच्याकडे केल्या. यामुळे अभ्यासक्रमाची वार्षिक मूल्यांकन पद्धत बंद करून सुरू केलेल्या सेमिस्टर पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आम्हाला वेळेतच अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे; मात्र या अडचणींमुळे करता येणे शक्य आहे का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
अनुपम खेर यांनी संस्थेला दिलेल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागतो याची गांभीर्याने दखल घेत दोन वर्षांपूर्वी नियामक मंडळाने नवीन अभ्यासक्रम तयार करून सेमिस्टर आणि श्रेणी पद्धत अस्तित्वात आणली. मात्र या नवीन पद्धतीमुळेही विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत.
विद्यार्थ्यांना वैयक्तिक प्रॅक्टिकल्ससाठी विशिष्ट कालावधी नियोजित केलेला असायचा. आपला कोणता विषय मिस झाला आहे हे विद्यार्थी शिक्षकांना सांगू शकत होते. मात्र, आता हा कालावधी कमी झाल्यामुळे काय मिस झाले याची चर्चा होत नाही. यातच आता तिसरे सेमिस्टर आहे जे शेवटच्या डिप्लोमा फिल्म बनविण्याइतकेच महत्त्वाचे मानले जाते. मात्र, त्याचे अद्याप कोणतेच नियोजन झालेले नाही. कॅमेºयाच्या लेन्सची मागणी केली तर या लेन्स महागड्या आहेत त्याला काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असे सांगितले जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी खेर यांना मागण्यांची प्रत सादर केली.
या तक्रारींसंदर्भात खेर यांनी विद्यार्थ्यांशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. यावर योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

सुचना मिळत नाहीत
पूर्वी वार्षिक मूल्यांकन पद्धत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात अभ्यासक्रम लवकर मिळायचा. मात्र नवीन अभ्यासक्रमामुळे सेमिस्टर सुरू होण्याच्या काही दिवस आधी अभ्यासक्रम दिला जात आहे.
काही विभागाच्या विद्यार्थ्यांना दोन सेमिस्टर सुरू झाल्यावर
अभ्यासक्रम मिळाला. अभ्यासक्रम मिळण्यास विलंब लागत असल्यामुळे आम्हाला नियोजन करणे अवघड होत आहे. कुठल्याच प्रकारच्या मार्गदर्शक सूचना मिळत नाहीत.

Web Title:  Complain about Kher, read the issue and complain about the curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.