आचारसंहितेचा मेट्रोकडून भंग?; ब्रिजेश दीक्षित यांना नोटीस बजावण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 03:45 AM2019-03-15T03:45:30+5:302019-03-15T03:45:46+5:30

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वांनी आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या विस्तारीकरणाची माहिती दिल्यामुळे दीक्षित अडचणीत आले आहेत.

Code of Conduct dissolve by metro ?; The possibility of issuing notice to Brijesh Dixit | आचारसंहितेचा मेट्रोकडून भंग?; ब्रिजेश दीक्षित यांना नोटीस बजावण्याची शक्यता

आचारसंहितेचा मेट्रोकडून भंग?; ब्रिजेश दीक्षित यांना नोटीस बजावण्याची शक्यता

Next

पुणे : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वांनी आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या विस्तारीकरणाची माहिती दिल्यामुळे दीक्षित अडचणीत आले आहेत. जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारीची चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दीक्षित यांना आचारसंहिता भंगची नोटीस बजावली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मेट्रोच्या विस्तारीकरणाची माहिती दिली. त्यात पुणे महापालिकेने स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या मेट्रोच्या विस्तारित मार्गासाठी खर्च करण्याची तयारी दर्शविली असून या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) तातडीने अंतिम स्वरूप दिले जाईल, असे दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचप्रमाणे वनाज ते रामवाडी दरम्यानचा मेट्रो मार्ग चांदणी चौकापर्यंत करण्याचे पत्र पुणे महापालिकेने महामेट्रोला पाठविले असल्याचेही सांगितले. मात्र, या संदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे.

नवल किशोर राम म्हणाले, मेट्रोकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. परंतु, आचारसंहिता भंगाची नोटिस बजाविण्यापूर्वी याबाबत चौकशी केली जाणार आहे. चौकशीनंतरच पुढची कार्यवाही
केली जाईल.

Web Title: Code of Conduct dissolve by metro ?; The possibility of issuing notice to Brijesh Dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.