पुण्यातल्या या चाैकात अाहे ज्ञानाचं भांडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 07:27 PM2018-05-15T19:27:52+5:302018-05-15T19:27:52+5:30

अाॅक्सफर्ड अाॅफ द इस्ट अशी अाेळख असलेल्या पुण्यातील अाप्पा बळवंत चाैक हा पुस्तकांचा चाैक म्हणून अाेळखला जाताे. विद्यार्थ्यांना हवं असलेलं प्रत्येक पुस्तक येथे मिळतं.

this chowk from pune is known as booksellers area | पुण्यातल्या या चाैकात अाहे ज्ञानाचं भांडार

पुण्यातल्या या चाैकात अाहे ज्ञानाचं भांडार

Next

पुणे : अाॅक्सफर्ड अाॅफ द इस्ट अशी अाेळख असलेल्या पुण्यात भारतातील विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. दर्जेदार शिक्षण, माेठी परंपरा असलेली महाविद्यालये यांमुळे पुणे हे शिक्षणासाठीचे उत्तम शहर म्हणून अाेळखले जाते. पुण्यातील अनेक ठिकाणांची विविध वैशिष्ट्ये अाहेत. असेच पुण्याच्या अाप्पा बळवंत चाैकाचे सुद्धा एक वैशिष्ट्य अाहे. पुण्यातील अाप्पा बळवंत चाैक अर्थात एबीसी हा पुस्तकांचा चाैक म्हणून अाेळखला जाताे. तुम्हाला हवं असलेलं प्रत्येक पुस्तक या चाैकात तुम्हाला मिळतं. 
    एल. एन. गाेडबाेले यांनी 1950 साली या ठिकाणी पहिले पुस्तकांचे दुकान सुरु केले अाणि बघता बघता या चाैकातील परिसर हा पुस्तकांचा परिसर म्हणून नावारुपास अाला. या ठिकाणी तुम्हाला हवी ती पुस्तके मिळतात. शैक्षणिक साहित्याचं हब म्हणून हे ठिकाण अाेळखलं जातं. अाजमितीला छाेटमाेठी शेकडाे पुस्तकांची दुकाने या ठिकाणी अाहेत. या दुकानांमध्ये खासकरुन शैक्षणिक पुस्तकांच्या दुकानांची संख्या अधिक अाहे. परीक्षांच्या काळात तसेच शाळा, महाविद्यालये सुरु हाेण्याअाधी या ठिकाणी विद्यार्थ्यांची माेठी गर्दी असते. अार्टस असाे, काॅमर्स असाे की सायन्स प्रत्येक विषयाचं पुस्तक तुम्हाला येथे मिळतं. त्याचबराेबर एकाच विषयाची विविध लेखकांची पुस्तकेही  हमकास येथे मिळतात. 


     शहराच्या मध्याभागी हा भाग असल्याने शहर व उपनगरातील विद्यार्थी पुस्तक खरेदीसाठी येथे येतात. या चाैकाला तसा एेतिहासिक वारसा सुद्धा अाहे. या ठिकाणी पंधराव्या शतकातील तांबडी जाेगेश्वरी देवीचं मंदिर अाहे. तसेच 1942 साली ब्रिटीशांच्या राज्यात एका मुलाने भारतीय झेंडा फडकावल्यामुळे दाेन भारतीयांना पाेलीसांनी गाेळ्या घातल्या हाेत्या. या ठिकाणाने अनेक पिढ्या घडवल्या अाहेत. पुण्यात शिकून गेलेले अनेकजण पुण्यात अाल्यानंतर अाप्पा बळवंंच चाैकाला भेट देतात. ज्या विद्यार्थ्यांची परिस्थीती बेताची अाहे, त्या विद्यार्थ्यांसाठी येथे सेंकड हॅंड पुस्तके सुद्धा मिळतात. त्याचबराेबर तुमच्याकडील शैक्षणिक पुस्तके सुद्धा येथील काही दुकानांमध्ये स्वीकारली जातात. कुठलंही प्रकाशन असाे किंवा कुठलाही लेखक अाप्पा बळवंत चाैकात ते पुस्तक मिळतेच मिळते. पुस्तक प्रेमी लाेकांचे हे अावडते ठिकाण अाहे. 

Web Title: this chowk from pune is known as booksellers area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.