पुण्यातील कोंढव्यात ८ वर्षाच्या चिमुरडीवर ६ जणांचे अत्याचार, एका आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 11:55 PM2017-12-21T23:55:32+5:302017-12-21T23:55:42+5:30

कोंढव्यात मिठानगर येथे एका पहिलीत शिकणा-या ८ वर्षाच्या चिमुरडीवर ६ जणांनी गेले ५ महिने अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

In Chomurdi, 8-year-old girl, six people were tortured and one accused was arrested | पुण्यातील कोंढव्यात ८ वर्षाच्या चिमुरडीवर ६ जणांचे अत्याचार, एका आरोपीला अटक

पुण्यातील कोंढव्यात ८ वर्षाच्या चिमुरडीवर ६ जणांचे अत्याचार, एका आरोपीला अटक

Next

पुणे : कोंढव्यात मिठानगर येथे एका पहिलीत शिकणा-या ८ वर्षाच्या चिमुरडीवर ६ जणांनी गेले ५ महिने अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका १८ वर्षाच्या मुलाला अटक केली असून अन्य पाच जण अल्पवयीन आहेत.

याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, हा घृणास्पद प्रकार आॅगस्ट महिन्यांपासून सुरु होता. ही मुलगी आणि मुले एकाच परिसरात राहात असून त्यातील दोन मुले १० वर्षाचे असून बाकीचे १२, ९ व ६ वर्षाचे आहेत. वस्तीमधील एका जणींने या मुलीच्या आजीला तिची मुले छेड काढतात, असे सांगितले. ही मुलगी वारंवार आजारी पडायची. गेल्या काही दिवसांपासून ती पोट दुखत असल्याची तक्रार करीत होती. त्यामुळे आजीने तिला एका डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांना तपासणी या मुलीच्या अंगावर काही जखमा दिसून आले. डॉक्टरांनी आपली शंका तिच्या आजीकडे बोलून दाखविली. त्यानंतर आजीने तिच्याकडे चौकशी केली असता तिने मारणार नाही ना असे घाबरत घाबरत विचारले. त्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. ही मुले तिला टेरेसवर घेऊन जात असत. तसेच एखाद्याच्या घरात कोणी नसेल तर त्यांच्या घरात घेऊन जात असत. आजीने या मुलीच्या वडिलांना हा प्रकार सांगितले. त्यांनी १८ वर्षाच्या मुलाला जाब विचारता त्याने कबूल केले.  त्यानंतर त्यांनी कोंढवा  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी १८ वर्षाच्या मुलाला अटक केली असून बाकींची सुधारगृहात रवानगी केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड अधिक तपास करीत आहेत़.

Web Title: In Chomurdi, 8-year-old girl, six people were tortured and one accused was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.