नाणेटंचाईमुळे ‘चिल्लर’चा काळा धंदा, सुट्या पैशांसाठी वस्तू खरेदीची सक्ती, कमिशन घेण्याचे वाढले प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:39 AM2018-04-03T03:39:18+5:302018-04-03T03:39:18+5:30

नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आला आहे. नाणेटंचाईला व्यापारी वैतागले असून, काहीजण टक्केवारीने नाण्यांचा काळाधंदा करीत आहेत. हॉटेल, मेडिकल, पानटपरी, दूधविक्रेते, वृत्तपत्रविक्रेते यांच्याकडे सध्या चॉकलेटच्या मोठ-मोठ्या बरण्या दिसून येत आहेत.

 Chillar's black business due to scarcity of money, forced to buy goods for loose money, increased type of commission commission | नाणेटंचाईमुळे ‘चिल्लर’चा काळा धंदा, सुट्या पैशांसाठी वस्तू खरेदीची सक्ती, कमिशन घेण्याचे वाढले प्रकार

नाणेटंचाईमुळे ‘चिल्लर’चा काळा धंदा, सुट्या पैशांसाठी वस्तू खरेदीची सक्ती, कमिशन घेण्याचे वाढले प्रकार

Next

रहाटणी - नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आला आहे. नाणेटंचाईला व्यापारी वैतागले असून, काहीजण टक्केवारीने नाण्यांचा काळाधंदा करीत आहेत. हॉटेल, मेडिकल, पानटपरी, दूधविक्रेते, वृत्तपत्रविक्रेते यांच्याकडे सध्या चॉकलेटच्या मोठ-मोठ्या बरण्या दिसून येत आहेत. चिल्लर नसल्याचे सांगत ग्राहकांच्या माथी चॉकलेट मारीत आहेत. अगदी रुपयापासून ते दहा रुपयांपर्यंत ग्राहकांना चॉकलेट दिले जात आहे. नाण्यांची टंचाई काही जणांकडून जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे.

काही वर्षांपासून नाणेटंचाईला व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. याचाच फायदा घेत काही जण नाण्यांची टक्केवारीने विक्री करीत आहेत. त्यांचा नाणे विक्रीचा एक स्वतंत्र व्यवसायच बनला आहे. ही मंडळी विविध देवस्थान, भिकारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नाणी मिळवितात. नाण्यांची वर्गवारी करण्यात येते. १०० रुपयांच्या पटीत संच तयार करून गरजू व्यावसायिक आणि व्यापाºयांना त्याचा पुरवठा करण्यात येतो. शंभर रुपयांना १० ते २० टक्के दराप्रमाणे कमिशन घेऊन हा पुरवठा होतो. असा हा काळा धंदा शहरात राजरोसपणे सुरू आहे. आता ५० पैसे, एक रुपयाचे व्यावहारिक मूल्य घसरल्याचे दिसून येते. नाण्यांसह नोटांच्या बाबतीतही तसेच घडले. एक, दोन आणि पाच रुपयांच्या नोटा चलनात दिसून येत नाहीत. पाच रुपयांच्या जुन्या फाटक्या नोटा काही ठिकाणी दिसून येतात. त्या नोटा इतक्या जीर्ण आहेत त्यांना सहजतेने बाळगणे जिकिरीचे आहे.
रिझर्व्ह बँकेकडून जिल्हा कोषागार शाखेला वर्षातून ठरावीक वेळा नवीन नोटा आणि नाण्यांचा पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे, दोन हजारांच्या रुपये मूल्य असलेल्या नवीन नोटा सातत्याने चलनात येत असतात. त्याचप्रमाणे एक रुपया, दोन रुपये, पाच आणि दहा रुपयांच्या नवीन नाण्यांचा वर्षातून ठरावीक वेळा पुरवठा केला जातो. बाजारपेठेत सुट्या पैशांची टंचाई आहे.

दहा रुपयांची नाणी बंदची अफवा
दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा काही दिवसांपासून जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. रिझर्व्ह बँकेने अनेक वेळा जाहीर करूनही अनेक व्यापारी दहा रुपयांचे नाणे घेण्यास नकार देत आहेत. याचे कारण की, दहा रुपयांचे नाणे चलनातून बंद झाले म्हणून ही नाणी नागरिक भिकाºयांच्या पदरात टाकतील किंवा एखाद्या दानपेटीत. असे झाले तर सुट्या पैशांवर ज्यांचा डोळा आहे, त्यांचे मोठ्या प्रमाणात फावणार आहे. म्हणून नागरिकांनी व व्यापाºयांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

दानपेटीत चिल्लर जादा
नवीन नोटा आणि नाणी प्रथमत: जेव्हा बाजारात येतात तेव्हा नावीन्यपूर्ण कुतूहलापोटी चलनात हस्ते, परहस्ते फिरतच नाहीत. उलट त्यांचा संग्रह केला जातो. त्यामुळे आजही आपल्याला बाजारात १० रुपयांची नवीन नाणी चलनात येऊनसुद्धा म्हणावे तेवढ्या प्रमाणात पाहायला मिळत नाहीत. विविध मंदिरांच्या दानपेटीत भाविक नाणी आवर्जून टाकतात. अनेक हॉटेलमधून चिल्लर नाही, असे कारण सांगून त्याऐवजी चक्क चॉकलेटच ग्राहकांच्या हाती ठेवले जाते. अशा तºहेने नाण्यांच्या टंचाईमुळे चॉकलेटचा धंदाही भरभराटीस आला आहे.

भिकाºयांवर अनेकांचा डोळा
सुट्या पैशांसाठी अर्थात नाण्यांसाठी अनेक व्यावसायिक मेटाकुटीला येतात. रोज जेवढी चिल्लर आणावी तेवढी थोडीच पडत असल्याची खंत अनेक व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. आपल्या दुकानात भीक मागण्यासाठी आलेल्या भिकाºयांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून चिल्लर कमिशन देऊन घेतली जाते. कमिशनच्या अपेक्षेने काही भिकारी दररोज काही व्यावसायिकांना चिल्लरचा पुरवठा करतात. काही एजंट भिकाºयांकडून चिल्लर जमा करतात. भिकाºयांना काही टक्केवारी देऊन एजंट दररोज व्यावसायिकांना कमिशनपोटी चिल्लर पुरवठा करतात. असे एजंट संबंधित भिकाºयांना व्यावसायिकांपर्यंत पोहोचू देत नाहीत. एखादा भिकारी एजंटाला डावलून व्यावसायिकाकडे गेल्यास त्या परिसरातून त्याला हद्दपार केले जाते. त्यामुळे भिकाºयांवरही एजंटांचा दबाव असल्याचे दिसून येते.

सुट्या पैशांची अडचण कायमची दूर होण्यासाठी सर्व प्रकारचे भाडे, मालाच्या किमती पूर्णांकात ठेवण्यात याव्यात किंवा रिझर्व्ह बँकेकडून मोठ्या प्रमाणात नाणेपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिक आणि ग्राहकांकडून होत आहे.

ग्राहकांनाच बसतेय झळ
नाणेटंचाईचा फटका फक्त ग्राहकांना बसतो असे नव्हे; तर व्यावसायिकही त्रस्त आहेत. नाणे विकत घेऊनसुद्धा ती कधी ना कधी संपतात. मग पुन्हा त्यासाठीच त्रस्त व्हावे लागते. १७२ रुपये बिल होते तेव्हा दोन रुपये सुटे नसल्याने केवळ १७० रुपये अदा केले जातात. त्यामुळे संबंधित व्यावसायिकालाही त्याचा फटका बसतो. बहुतांशवेळा ग्राहकांनाच याची झळ सहन करावी लागते. अशा वेळी संबंधित व्यावसायिक तीन किंवा सात रुपयांचे चॉकलेट अथवा अन्य सामान ग्राहकाच्या माथी मारत असतो. यातून बºयाचदा वाद होतात. अनेक वेळा ग्राहक आणि व्यावसायिकांना तडजोड करावी लागते.

Web Title:  Chillar's black business due to scarcity of money, forced to buy goods for loose money, increased type of commission commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.