सतरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी फरार आरोपीला साताऱ्यातून अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:12 PM2018-03-30T17:12:31+5:302018-03-30T17:12:31+5:30

आरोपीने सासवड बाजारपेठेतील फिर्यादीच्या दुकानातून १७ लाख ९७ हजार ८१६ रुपये किमतीचे सिमेंट खरेदी करत त्याची परस्पर विक्री करून फसवणूक केली होती.

cheating of 17 lakh rupees case criminal Arrested from Satara | सतरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी फरार आरोपीला साताऱ्यातून अटक  

सतरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी फरार आरोपीला साताऱ्यातून अटक  

Next
ठळक मुद्देया फसवसणुकप्रकरणी सुधीर माणिकचंद मुथा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार

लोणी काळभोर : दोन वर्षापूर्वी परस्पर सिमेंटची विक्री करुन सतरा लाख ९७ हजार ८१६ रुपयांची व्यापा-याची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने यश मिळवले आहे.योगेश कांतीलाल शहा ( वय ३८, रा.नºहे रोड, धायरी,सध्या रा.विकासनगर, सातारा ) यास अटक करण्यात आली आहे . 
     स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,या फसवसणुकप्रकरणी सुधीर माणिकचंद मुथा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.सुधीर मुथा यांचे सासवड बाजारपेठ येथे मुथा अँड सन्स एसीसी सिमेंट नावाचे डिलरशिप दुकान आहे. या ठिकाणावरून शहा याने मुुुथा यांचा विश्वास संपादन करून दुकानातून १७ लाख ९७ हजार ८१६ रुपये किमतीचे सिमेंट खरेदी करत त्याची परस्पर विक्री करून फसवणूक केली होती. हा गुन्हा केल्या पासून शहा फरार झाला होता तो सातारा येथे राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना मिळाली. त्यानंतर सदर पथकाने सातारा येथे जाऊन माहिती गोळा करण्यात सुरवात केली. सदर आरोपी सातारा येथील आदर्श नगर चौकात येणार असल्याचाी माहिती वरील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. 
 शहावरसासवड व नारायणगाव पोलीस ठाण्यासह विविध ठिकाणी फसवणूकीचे गुन्हे दाखल गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस पुढील तपास करत आहे.

Web Title: cheating of 17 lakh rupees case criminal Arrested from Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.