चेंबर्स, खड्ड्यांमध्ये धडधडतेय वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:03 PM2019-07-18T13:03:02+5:302019-07-18T16:39:33+5:30

खड्डे, ड्रेनेजची चेंबर्स उघडी पडल्याने धडधडतच प्रवास करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे...

Chambers, deep hole is very problematic for punekar | चेंबर्स, खड्ड्यांमध्ये धडधडतेय वाहतूक

चेंबर्स, खड्ड्यांमध्ये धडधडतेय वाहतूक

googlenewsNext
ठळक मुद्दे शहरातील प्रमुख आठ रस्त्यांवर तब्बल ७० मोठे खड्डे २० ठिकाणी चढउताराचा रस्ता असून तब्बल १९५ धोकादायक चेंबर्स

- अतुल चिंचली -

पुणे:  पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले असतानाच महापालिकेच्या वतीने रस्त्याच्या मधोमध असलेल्या ड्रेनेजची चेंबर्स उघडी पडल्याने धडधडतच प्रवास करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. शहरातील प्रमुख आठ रस्त्यांवर तब्बल ७० मोठे खड्डे आहेत. २० ठिकाणी चढउताराचा रस्ता असून तब्बल १९५ धोकादायक चेंबर्स असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. या परिसरात सातत्याने किरकोळ अपघात होत असून गाडी घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.

लहान खडयांची तर गणतीच नाही. 
शहरातील शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कर्वे रस्ता, आपटे रस्ता अशा प्रमुख रस्त्यांची पाहणी करण्यात आली. 
पूर्वी डांबरी रस्त्यांचे प्रमाण अधिक होते. पण आता डांबरी, सिमेंट आणि ब्लॉक अशा तीन प्रकारात रस्ते आहेत. त्यामुळे  चढउतार वाढल्याने रस्ता सलग राहिला नाही.  प्रशासन रस्त्याची दुरुस्ती करते. त्यावेळी ज्या ठिकाणी खड्डा झाला असेल तेवढाच भाग डांबरीकरण केले जाते. त्यामुळे रस्त्यांची चढउतार होत आहे. काही ठिकाणी डांबरच्या रस्त्यात खड्डा आला म्हणून ब्लॉक बसवण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यावर डांबर टाकण्यात आले आहे. 
         शनिवारवाडा ते स्वारगेट या शिवाजी रस्त्यावर सुमारे ५७ चेंबर्स आणि १५ खड्डे दिसून आले आहेत. सिमेंटच्या बंद चेंबर्सभोवती डांबराचा थर असल्याने मधला भाग खोलगट झाला आहे. एक प्रकारे खड्डाच झाला आहे. लालमहाल ते बुधवार चौक डांबरीकरण केले आहे. तेवढाच भाग सुधारित असल्याचे दिसून आले. मंडईच्या पुढे मधूनच सिमेंटचा रस्ता आहे. स्वारगेटपर्यंत पुन्हा डांबरचा रस्ता आहे.  या रस्त्यात असणाऱ्या गतिरोधकावर खड्डे पडले आहेत.  काही ठिकाणी वाळू उघडी पडल्याने वाहने घसरत आहेत.  पावसात तर पाणी साचल्याने खड्डा समजत नाही. त्यामुळे वाहने अडकून बसतात. 
        सारसबाग चौक ते टिळक चौक हा टिळक रस्ता दुहेरी आणि अरुंद आहे. टिळक रस्त्यावर चेंबर्समुळे २७ आणि इतर ५ खड्डे दिसून आले.  या दुहेरी रस्त्यावर मधोमध बंद चेंबर्सचे अधिक प्रमाण दिसून आले. खड्डेमय रस्त्यासोबत साठलेले पाणी, वाळू  आहे. सप महाविद्यालयाच्या चौकात चारही बाजूने वाहने येतात. त्याठिकाणी चेंबर्समुळे झालेली रस्त्यांची चढउतार वाहनांना धोकादायक  आहे. पदपथाशेजारीसुद्धा खड्डे असल्याने पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा होतो. लांबून चेंबर दिसते मात्र जवळ आल्यावर अचानक खड्डा दिसल्याने चालकांची गडबड होत आहे. चालक एकदम ब्रेक लावतात. त्यामुळे एकमेकांना धडकतात. 
             टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक हा  केळकर रस्ता  दुहेरी आहे. या रस्त्यावर २३ चेंबर्स आणि ६ खड्डे  आहेत.  झेड ब्रिज चौकात  उंचसखल रस्ता आहे.  माती गणपती, रमणबाग  आणि , अप्पा बळवंत चौक या तीनी  चौकांची अवस्था  वाईट आहे.  वळणावर उंचसखल रस्ता,  लोखंडी चेंबर  आहेत. 
       समाधान चौक ते टिळक चौक हा एकेरी लक्ष्मी रस्ता आहे. या रस्त्यावर  ११ चेंबर्स व पाच खड्डे आहेत. रस्त्यावर डांबराचे थरावर थर आहेत. या रस्त्यावर लहान खड्डयांचे प्रमाण अधिक  आहे.  
               सारसबाग ते शनिवारवाडा हा बाजीराव रस्ता एकेरी आहे.  सुमारे ४० चेंबर्स व  ६ ठिकणी खड्डे आहेत.  ९ ठिकाणी उंचसखल रस्ता आहे. हा रस्ता रुंद  असल्याने वाहने वेगाने जातात. खड्ड्यातून किंवा चेंबर्सवरून गेल्याने दुचाकी वाहनाचा तोल जाऊन अपघात  होतात.  भिकारदास मारुती चौक, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौकात खड्डे आणि चेंबरमुळे दुरवस्था झाली आहे.  रस्त्याच्या मध्येमध्ये गतिरोधकासारखे डांबराचे थर दिसून आले आहेत. 
 खंडूजी बाबा चौक ते कर्वे पुतळा हा कर्वे रस्ता दुहेरी वाहतुकीचा आहे.
कर्वे रस्त्यावर ३२ चेंबर्स २५ खड्डे  आहेत. त्यातच  मेट्रोचे काम चालू  असल्याने रस्ता अरुंद आहे. त्यातून खड्डे आणि चेंबर्समूळे चालकाला वाहने चालवण्यास अडथळा निर्माण होत आहे. खंडूजी बाबा चौक ते नळस्टॉप रस्त्यावर लहान खड्डे अधिक प्रमाणात आहेत. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर वाळू आणि खडी पसरली आहेत. वाहन चालकांना खड्ड्याबरोबरच या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहन चालवताना मधोमध येणारे चेंबर चालकाला भांबावून टाकत आहे. 

दुचाकी वाहनांसाठी धोकादायक
या रस्त्यांवर  दुचाकीचा तोल जाऊन अपघात होत आहे. दुचाकी अचानक खड्ड्यातून जाऊन चालकाला पाठदुखी आणि अंगदुखीला सामोरे जावे लागते. असे नागरिकांनी सांगितले आहे. पावसाळ्यात बंद चेंबर्समधून पाणी जात नाही. तरीही एका चौकातून दुसº्या चौकात दहा ते बारा बंद चेंबर्स बसवण्यात आले आहेत. त्यांचा काही उपयोग होत नाही. परंतु वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. 
 

Web Title: Chambers, deep hole is very problematic for punekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.