चाळकवाडी टोल तूर्त बंद होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:44 AM2018-07-18T01:44:09+5:302018-07-18T01:45:34+5:30

पुणे-नाशिक महामार्गावरील वडगाव आनंद येथील बायपासचे काम करण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला स्थानिक लोकप्रतिनिधीने दमबाजी केल्यामुळे ठेकेदार काम सोडून निघून गेला

 Chalakwadi toll to be closed soon? | चाळकवाडी टोल तूर्त बंद होणार?

चाळकवाडी टोल तूर्त बंद होणार?

googlenewsNext

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील वडगाव आनंद येथील बायपासचे काम करण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला स्थानिक लोकप्रतिनिधीने दमबाजी केल्यामुळे ठेकेदार काम सोडून निघून गेला, अशी ग्वाही टोल कंपनीच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकारी यांच्यासमोर दिली आहे़ मात्र तो लोकप्रतिनिधी कोण? हे सांगण्यास भीतीपोटी असमर्थता व्यक्त केली़ दरम्यान, रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करू नये, अशी मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी तूर्त टोलनाका बंद ठेवण्यास अनुकूलता दर्शविली.़ टोलसंदर्भात येत्या दि़ २० जुलै रोजी मुंबई येथे बैठक होणार आहे, अशी माहिती प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली़
टोल बंद आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आयोजिलेल्या बैठकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवानेते अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, ‘विघ्नहर’चे संचालक संतोषनाना खैरे, भीमाजीशेठ गडगे, गुलाब नेहरकर, अनंतराव चौगुले, धनंजय काळे, सूरज वाजगे, टोलनाक्याचे प्रतिनिधी दाऊद खान, बाधित शेतकरी, आळे गावचे प्रतिनिधी, विविध मान्यवर उपस्थित होते़
या बैठकीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भूसंपादनाच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली़ बाधितांना पारदर्र्शक पद्धतीने व जलदगतीने पैसे मिळणे अपेक्षित होते़ शेतकऱ्यांचे पैसे कोर्टात पाठविले ही चूक आहे़ ती दुरुस्त करून शेतकºयांना लवकरात लवकर पैसे अदा करण्यात येतील़ तसेच तालुक्याच्या ठिकाणी विभागीय कार्यालय सुरू करून तेथे बाधित शेतकºयांचे प्रश्न सोडविले जातील़ ज्यांचे हिअरिंग आहे लवकर घेऊन निर्णय दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली़
बायपासचे काम पूर्ण का होत नाही, अशी विचारणा केली असता, तसेच अतुल बेनके यांनी भूसंपादनाचे लेख जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी टोलचालकांकडे काम अपूर्ण का? याबाबत विचारणा केली. कंपनीचे प्रतिनिधी खान म्हणाले, की इन्व्हेस्टमेंट खूप
झाली आहे, काम करण्यास पैसे शिल्लक नाहीत़
यावर जिल्हाधिकारी यांनी पैशांची जबाबदारी तुमची आहे, काम पूर्ण झालेच पाहिजे, अशी सूचना केली़ सबठेकेदार पळून का गेला? याबाबत खान यांनी वडगाव आनंद येथील बायपासचे काम सुरू करताना स्थानिक लोकप्रतिनिधीने धमकाविल्याने तो ठेकेदार निघून गेला, अशी माहिती दिली़ यावर उपस्थितांनी लोकप्रतिनिधींच्या नावाचा खुलासा करावा, अशी मागणी केली असता, खान यांनी नाव सांगण्यास भाग पाडू नका, अशी विनंती केल्याने जिल्हाधिकारी यांनी आपल्याला एकांतात नाव सांगावे, असे सांगून यावर पडदा पाडला़
बायपासचे काम जलदगतीने करावे़ येत्या दि़ २० जुलै रोजी मुंबई येथे केंद्र सरकारचे प्रतिनिधी, ठेकेदार, कंपनीला फायनान्स पुरविणारे प्रतिनिधी, अतुल बेनके व इतर मान्यवर यांची बैठक घेण्यात येणार आहे़ यावेळी बेनके यांनी काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका बंद करावा, अशी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी टोलनाका तूर्त बंद ठेवण्याचे मान्य केले़ तसेच आळे येथील पिण्याच्या पाण्याची व्यथा समजावून घेऊन ती पाईपलाईन लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी
यांनी दिले़

Web Title:  Chalakwadi toll to be closed soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.