माॅर्निंग वाॅकला जाताना घ्या काळजी; चाेरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील हिसकावली चैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 05:47 PM2018-06-25T17:47:03+5:302018-06-25T17:51:09+5:30

माॅर्निंग वाकला निघालेल्या 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील साेन्याची चैन हिसकावल्याची घटना समाेर अाली अाहे.

chain snatching at kamla neharu gardan | माॅर्निंग वाॅकला जाताना घ्या काळजी; चाेरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील हिसकावली चैन

माॅर्निंग वाॅकला जाताना घ्या काळजी; चाेरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील हिसकावली चैन

Next

पुणे :  माॅर्निंग वाॅकला चाललेल्या एका 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील साेन्याची चैन हिसकावल्याची घटना साेमवारी सकाळी 6 वाजता घडली. दुचाकीवर अालेल्या अज्ञात इसमाने चैन हिसकावून पाेबारा केला. याप्रकरणी डेक्कन पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.


    विनायक गाेडबाेले (वय 73) यांनी डेक्कन पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला अाहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक गाेडबाेले अाणि त्यांच्या पत्नी साेमवारी सकाळी 6 च्या सुमारास अापली चारचाकी कमला नेहरु उद्यानाच्या जवळ लावून पायी निघाले हाेते. यावेळी त्यांच्या मागून दुचाकीवरुन अालेल्या अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅमची साेन्याची चैन हिसकावून पाेबारा केला. काही काळ गळ्यातील चैन चाेरी झाल्याचे गाेडबाेले यांच्या लक्षातही अाले नाही. अवघ्या काही सेकंदात चाेरट्याने चैन लांबवली. ही सगळी घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली अाहे. चाेरट्याच्या शाेधासाठी दाेन टीम तयार करण्यात अाल्या असून याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पाेलीस निरिक्षक राहुल काेलंबीकर करीत अाहेत. 


  पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये चैन हिसकावण्याच्या तसेच रात्रीच्या वेळी लुटण्याच्या घटना वाढल्या असून माॅर्निंग वाॅकला जाताना अापल्या माैल्यवान वस्तूंची काळजी घेणे गरजेचे अाहे. 

Web Title: chain snatching at kamla neharu gardan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.