चर्चा तर होणारच : पुण्यात सायकलवर फिरून उमेदवाराचा प्रचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 09:04 AM2019-04-18T09:04:59+5:302019-04-18T09:05:02+5:30

निवडणूक आल्यावर विविध संकल्पना लढवत उमेदवार प्रचार करत असतात. अनेकदा त्यांना मिळालेले चिन्हांशी निगडीत गाण्यांचा वापरही केला जातो. जास्तीत जास्त मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी या-ना त्या कारणांनी चर्चेत राहण्यासाठी उमेदवार प्रयत्नांची शिकस्त करत असतात.

Campaigning of candidates by going on cycling in Pune | चर्चा तर होणारच : पुण्यात सायकलवर फिरून उमेदवाराचा प्रचार 

चर्चा तर होणारच : पुण्यात सायकलवर फिरून उमेदवाराचा प्रचार 

Next

 

पुणे : निवडणूक आल्यावर विविध संकल्पना लढवत उमेदवार प्रचार करत असतात. अनेकदा त्यांना मिळालेले चिन्हांशी निगडीत गाण्यांचा वापरही केला जातो. जास्तीत जास्त मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी या-ना त्या कारणांनी चर्चेत राहण्यासाठी उमेदवार प्रयत्नांची शिकस्त करत असतात. पुण्यातही असाच एक आगळावेगळा प्रचार एक उमेदवार करत आहे. चारचाकी, दुचाकी रिक्षा, बैलगाडी अशी वाहने वापरात असताना सायकलवर फिरून आनंद वांजपे नावाचे उमेदवार आपला पर्यावरणाचा अजेंडा मांडत आहेत. 

पुणे लोकसभा मतदार संघासाठी येत्या २३ एप्रिलला मतदान आहे. या निवडणुकीत युतीचे गिरीश बापट यांच्या विरोधात आघाडीचे मोहन जोशी अशी टक्कर आहे. पण आता अपक्ष उभे असलेले उमेदवारीही लक्ष वेधण्यासाठी शक्कल लढवताना दिसत आहे.वांजपे यांनी तर थेट सायकलवरून फिरत त्यांचा पर्यावरणाचा अजेंडा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत ते लोकमतशी बोलताना म्हणाले की, पुण्याचे वाढते प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यामुळे मी प्रचारही पर्यावरणपूरक करत आहे.आता त्यांच्या या प्रचारतंत्राला पुणेकर कसा प्रतिसाद देतात हे मात्र २३ मे'ला स्पष्ट होईल. 

Web Title: Campaigning of candidates by going on cycling in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.