बांग्लादेशातील भारतीय वकिलाची पुण्यात मदतीची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:02 PM2018-06-14T14:02:00+5:302018-06-14T14:02:00+5:30

एका हिंदू मुलीची घेतलेली केस सोडून द्यावी याकरिता माझ्यावर दबाव आला. त्यानंतर वेळोवेळी धमकी देऊन माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला देखील झाला.

Call for help from Indian lawyer from Bangladesh at Pune | बांग्लादेशातील भारतीय वकिलाची पुण्यात मदतीची हाक

बांग्लादेशातील भारतीय वकिलाची पुण्यात मदतीची हाक

Next
ठळक मुद्देकट्टर इस्लामिक मूलतत्ववाद्यांचा वकिली व्यवसाय सोडावा याकरिता दबाव बांग्लादेशमध्ये सुमारे चार लाख वकील असून त्यापैकी तीन हजार हिंदू वकील भारताचे परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान यांना पत्र लिहून याप्रकरणी लक्ष्य घालून योग्य ती कारवाईची मागणी करणार

पुणे : एका हिंदू मुलीची घेतलेली केस सोडून द्यावी याकरिता दबाव आला. त्यानंतर वेळोवेळी धमकी देऊन दोनवेळा प्राणघातक हल्ला देखील झाला. मात्र, बांग्लादेश मध्येच राहावयाचे असल्याने धमक्यांना घाबरलो नाही. अखेर राहते घर जमीनदोस्त करून २४ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला. त्यामुळे भाडयाच्या घरात राहावे लागत आहे...ही कैफियत आहे बांगलादेश मधील ढाका येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या रवींद्र घोष यांची.. मी पत्नी आणि मुलांसह बांग्लादेश मधील ढाका येथे राहतो. बांग्लादेशमधील ढाका येथे राहत असलेले रवींद्र घोष हे वकील बुधवारी पुणे न्यायालयात वकिलांनी मदत करावी याकरिता दाखल झाले. 
बांग्लादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू वकिलांवर अत्याचार होत असून मागील २५ वर्षापासून अधिककाळ सर्वाेच्च न्यायालयात आपण वकिली करतो. मात्र, कट्टर इस्लामिक मूलतत्ववाद्यांनी आपणावर वकिली व्यवसाय सोडावा याकरिता दबाव टाकत आहेत. माझ्याप्रमाणे इतर हिंदू वकिलांवर अत्याचार होत असून भारतीय प्रशासनाने याप्रकरणी लक्ष्य घालून बांग्लादेशातील हिंदूवरचे अत्याचार थांबवावेत अशी मागणी पत्रकारांशी बोलताना अ‍ॅड. घोष यांनी केली आहे. 
अ‍ॅड.घोष म्हणाले, मी पत्नी आणि मुलांसह बांग्लादेश मधील ढाका येथे राहतो. बांग्लादेशच्या सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्यावर ही मूलतत्ववाद्यांनी दबाव टाकून नोव्हेंबर २००७ मध्ये त्यांना राहत्या घरात बंदी बनवून त्यांच्याकडून जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला. बांग्लादेशमध्ये सुमारे चार लाख वकील असून त्यापैकी तीन हजार हिंदू वकील आहे. तर, ढाका येथील सर्वाेच्च न्यायालयात सुमारे दहा हजार वकील असून त्यापैकी २६३ हिंदू वकील असून त्यापैकी माझ्यासारख्या ५० वकिलांवर अत्याचार करण्यात येत आहे. 
याबाबत अधिवक्ता परिषदेचे शहर सचिव अ‍ॅड. सागर सातपुते म्हणाले, अधिवक्ता परिषदेतर्फे  बांग्लादेश मधील वकिलांवर होणा-या अत्याचाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो. वकील हे न्यायालयात लोकांची बाजू मांडत असतात. त्यांना मोकळेपणाने त्यांचे काम करण्याची मुभा मिळावी. याप्रकरणी आम्ही भारताचे परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान यांना पत्र लिहून याप्रकरणी लक्ष्य घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. 
....................................

Web Title: Call for help from Indian lawyer from Bangladesh at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.