कॅगकडे गैरव्यवहारांच्या तक्रारी, विद्यापीठातील लेखापरीक्षणास मुदतवाढ, स्थावर विभागावर आक्षेप नोंदविले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 03:25 AM2017-09-14T03:25:58+5:302017-09-14T03:26:19+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा, स्थावर विभागातील गैरप्रकारांबाबत नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या असून याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कॅगच्या अधिकाºयांनी याची दखल घेऊन लेखापरीक्षणास मुदतवाढ दिली आहे.

CAG complaint scams, extension of university audit, objection to real estate |  कॅगकडे गैरव्यवहारांच्या तक्रारी, विद्यापीठातील लेखापरीक्षणास मुदतवाढ, स्थावर विभागावर आक्षेप नोंदविले  

 कॅगकडे गैरव्यवहारांच्या तक्रारी, विद्यापीठातील लेखापरीक्षणास मुदतवाढ, स्थावर विभागावर आक्षेप नोंदविले  

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा, स्थावर विभागातील गैरप्रकारांबाबत नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या असून याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कॅगच्या अधिकाºयांनी याची दखल घेऊन लेखापरीक्षणास मुदतवाढ दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे २०१२-२०१३ ते २०१५-१६ या आर्थिक वर्षांचे कॅगकडून लेखापरीक्षण करण्यात येत आहे. १० आॅगस्ट ते १ सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये हे लेखापरीक्षण होणार होते. मात्र कॅगकडे आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या लेखापरीक्षणास मुदतवाढ देण्यात आली आहे.
परीक्षा विभागातील कामे मोठ्या प्रमाणात आऊटसोर्स केली जात आहेत. गेल्या १५ वर्षांपासून एका खासगी कंपनीला हॉल तिकीट, गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र यांचे प्रिंटिंग करण्याचे काम दिले आहे. या एजन्सीला कोट्यवधी रुपयांची कामे देताना ओपन टेंडर काढण्यात आलेले नाही. त्याचबरोबर आवश्यक ते सिक्युरिटी नॉर्म्स पाळण्यात आलेले नाहीत. विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचा डेटा खासगी एजन्सीकडे ठेवला जाणे गंभीर बाब असल्याचे या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
परीक्षा विभागाकडून २०१५-१६ मध्ये एका एजन्सीला १ लाख प्रामणपत्र छापण्याचे काम दिले होते. मात्र एका उपकुलसचिवांच्या चुकीमुळे ८० हजार पदवीप्रमाणपत्रे चुकीची छापली गेली. त्यानंतर ती पुन्हा नव्याने छापून घ्यावी लागल्यामुळे विद्यापीठाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्याचबरोबर कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या निवृत्तीला दीड महिना बाकी असताना त्यांनी कुलपतीमहोदयांची परवानगी न घेता पदवीप्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी करण्यात आलेला काही लाखांचा खर्च वाया गेला. धार्मिक स्थळे, पुतळे यांच्या बांधकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. आदी तक्रारी यामध्ये केल्या आहेत.
कॅगकडून लेखापरीक्षण केले जात असताना या बाबींची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. कॅगकडून याबाबत तपासणी केली जात आहे.

फर्निचर खरेदी आणि स्क्रॅपच्या विक्रीची करा तपासणी
विद्यापीठातील वैज्ञानिक उपकरणे, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू या स्क्रॅपमध्ये कवडीमोल भावात लिलावात विकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सुस्थितीतील फर्निचर लिलावात काढून नव्याने कोट्यवधी रुपयांचे फर्निचर खरेदी केले आहे. यामुळे विद्यापीठाच्या पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला असून याचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

कुंपणाच्या खर्चाची चौकशी करा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विभाग तसेच जंगलांना अनावश्यक कुंपणे घालण्यात आली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले. विद्यार्थ्यांना वसतिगृह, कॅन्टीनच्या चांगल्या सुविधा अद्यापही विद्यापीठाला देता आल्या नसताना हा नाहक खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर एकंदरीत विद्यापीठात नव्याने झालेली एकूण बांधकामे, कुंपणाची कामे व त्यावर झालेला खर्च याची सखोल चौकशी करण्याची मागणी कॅगकडे करण्यात आली आहे.

Web Title: CAG complaint scams, extension of university audit, objection to real estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे