सराईत गुन्हेगाराच्या गोळीबारात बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 10:46 AM2019-01-05T10:46:34+5:302019-01-05T10:49:37+5:30

पूर्वीच्या भांडणावरुन कारने जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर टिपू पठाणच्या टोळीतील एकाने लागोपाठ चार गोळ्या झाडल्या. या गोळ्या लावून मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

The builder's son was injured in a gunfight in pune | सराईत गुन्हेगाराच्या गोळीबारात बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा जखमी

सराईत गुन्हेगाराच्या गोळीबारात बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा जखमी

Next
ठळक मुद्देकारने जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर टिपू पठाणच्या टोळीतील एकाने लागोपाठ चार गोळ्या झाडल्या.निलेश शेखर बिनावत (25)असे या मुलाचे नाव आहे. हांडेवाडी रोडवरील तरवडे वस्ती येथे मध्यरात्री एकच्या सुमारास घडला.

पुणे : पूर्वीच्या भांडणावरुन कारने जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर टिपू पठाणच्या टोळीतील एकाने लागोपाठ चार गोळ्या झाडल्या. या गोळ्या लावून मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. निलेश शेखर बिनावत (25)असे या मुलाचे नाव आहे. हा प्रकार हांडेवाडी रोडवरील तरवडे वस्ती येथे मध्यरात्री एकच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिपू पठाण हा सराईत गुंड असून त्याच्या टोळक्याची महंमदवाडी रोड परिसरात दहशत आहे. शुक्रवारी रात्री रेल्वे लाईन परिसरात बिनावत व टिपू पठाण यांच्या मुलांमध्ये बाचाबाची झाली. त्यात बिनावत यांच्या साथीदारांना पठाण यांच्या मुलांनी मारहाण केली. हे समजल्यानंतर बिनावत याचे साथीदार पठाण रहात असलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी त्याच्या घरावर जोरदार दगडफेक केली. तेथे लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली. ही बाब पोलिसांना समजताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहिल्यावर सर्व जण पळून गेले. 

या दगडफेकीच्या प्रकाराने संतापलेल्या टिपू पठाण व त्याचे साथीदार बिनावत यांच्या हांडेवाडी रोडवरील बंगल्यावर चाल करुन गेले. त्यावेळी निलेश बिनावत हा आपल्या बहिणीचा आणण्यासाठी लँड क्रुझर गाडीतून चालला होता. त्याला पाहून टिपू पठाणच्या टोळीने त्याचा पाठलाग सुरू केला. टोळीतील एकाने दुचाकीवरुन पाठलाग करताना थेट कारवर एका पाठोपाठ चार गोल्या झाडल्या. त्यात निलेश जखमी झाला. पण त्या अवस्थेत त्याने गाडी न थांबविता येथे हडपसर पोलीस ठाण्यात नेली. पोलिसांनी हा प्रकार पहाताच निलेश याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. 

Web Title: The builder's son was injured in a gunfight in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.