कोरियन खेळाडुंची चित्तथरारक तायक्वांदो प्रात्यक्षिके; पुण्यातील मुलींनी घेतले स्व-रक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:07 PM2017-11-29T18:07:16+5:302017-11-29T18:11:35+5:30

श्वास रोखून धरणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके कोरिया येथून आलेल्या तायक्वांदोच्या खेळाडूंनी सादर केली. बोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

The breathtaking tiquando demonstration of Korean players; Pune girls take self-protection lessons | कोरियन खेळाडुंची चित्तथरारक तायक्वांदो प्रात्यक्षिके; पुण्यातील मुलींनी घेतले स्व-रक्षणाचे धडे

कोरियन खेळाडुंची चित्तथरारक तायक्वांदो प्रात्यक्षिके; पुण्यातील मुलींनी घेतले स्व-रक्षणाचे धडे

googlenewsNext
ठळक मुद्देबोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजनस्व-संरक्षणासाठी मुलींनी तायक्वांदो शिकणे आवश्यक : बाळकृष्ण भंडारी

पुणे : बारा फूट उंचीवर मारलेली कीक...डोळ्यावर पट्टी बांधून दाखविलेले स्व संरक्षणाचे तंत्र...अतिशय सुंदररित्या सादर केलेले तायक्वांदो अ‍ॅरोबिक्स...१२ फुटावर उडी मारुन फोडलेले वुडन प्लांक आणि  टेनीस बॉल, अशी श्वास रोखून धरणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके कोरिया येथून आलेल्या तायक्वांदोच्या खेळाडूंनी सादर केली.
बोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या प्राध्यापिका सिस्टर तारा, पर्यवेक्षिका लीना पॉल, तायक्वांदोचे प्रशिक्षक प्रोफेसर बाळकृष्ण भंडारी उपस्थित होते. यावेळी तायक्वांदोमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंचा सन्मान कोरियाच्या व्हानगींन सीन आणि जिआँगी ली यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रशिक्षक बाळकृष्ण भंडारी म्हणाले, कोरिया हे तायक्वांदोचे माहेरघर मानले जाते. त्यांचे तायक्वांदोतील कसब अतिशय पाहण्याजोगे असते. स्व-संरक्षणासाठी मुलींनी तायक्वांदो शिकणे हे अतिशय आवश्यक आहे. शाळेतील मुलींनी मोठ्या संख्येने तायक्वांदो शिकण्यास प्रवृत्त व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. 

Web Title: The breathtaking tiquando demonstration of Korean players; Pune girls take self-protection lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.