Video - बोरघाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, मोठा अपघात टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 09:17 AM2019-06-14T09:17:34+5:302019-06-14T09:20:45+5:30

लोणावळ्याजवळच्या रेल्वे रुळावर अचानक दरड कोसळल्याने मोठा अपघात टळला आहे. 13 जून रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान ही दरड रुळावर कोसळली.

A boulder fell on the railway tracks near Lonavala | Video - बोरघाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, मोठा अपघात टळला

Video - बोरघाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, मोठा अपघात टळला

Next
ठळक मुद्देलोणावळ्याजवळच्या रेल्वे रुळावर अचानक दरड कोसळल्याने मोठा अपघात टळला आहे. 13 जून रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान ही दरड रुळावर कोसळली.रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं अनेक मेल आणि एक्स्प्रेस प्रभावित झाल्या आहेत.

पुणे - लोणावळ्याजवळच्या रेल्वे रुळावर अचानक दरड कोसळल्याने मोठा अपघात टळला आहे. 13 जून रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान ही दरड रुळावर कोसळली. रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं अनेक मेल आणि एक्स्प्रेस प्रभावित झाल्या आहेत. दरड कोसळत असतानाची चित्रे सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर गुरुवारी रात्री लोणावळ्याजवळ दरड कोसळली. ठाकूर वाडी ते मंकीहिल दरम्यान दरड कोसळली होती. पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळीच याबाबत माहिती दिल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला आहे.या दुर्घटनेमुळे मुंबई-कोल्हापूर 11023 ही सह्याद्री एक्स्प्रेसही दोन तासांनी उशिरानं धावत होती. दरड हटवण्यात आली असून, इतर रुळांचीही तपासणी केली जात आहे.

Web Title: A boulder fell on the railway tracks near Lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.