आसखेड : ट्रकमधून फरशी उतरवत असताना फरश्या निसटून अंगावर पडल्याने खालुंब्रे (ता. खेड) गावाच्या हद्दीतील इकॉनॉमिक प्रोसेस सोल्यूशन कंपनीत शनिवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत दोन कामगार जागीच ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. महावीर केशर राजिया (वय ४६, रा. चिखली) व शार्दूल गोविंद सिंह (वय २७, रा. निगडी) अशी या अपघातात ठार झालेल्या कामगारांची नावे असून, संदीप महावीर राजिया (वय २३), जगदीश हनुमान चौधरी (वय ४०), दिनेश द्वारकाप्रसाद कुमावत (वय ३०) व जिखी आत्माराम पटेल (वय २२) हे चार कामगार जखमी झाले आहेत.