पुण्यात भाजपाचा प्रचार सुरू, काँग्रेसच्या गोटात अजूनही चल बिचल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:03 PM2019-03-26T12:03:34+5:302019-03-26T12:04:50+5:30

भाजपाने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली व प्रचारालाही सुरूवात केली आहे.

The BJP's campaign in Pune start , the Congress is still on waiting mode | पुण्यात भाजपाचा प्रचार सुरू, काँग्रेसच्या गोटात अजूनही चल बिचल 

पुण्यात भाजपाचा प्रचार सुरू, काँग्रेसच्या गोटात अजूनही चल बिचल 

Next
ठळक मुद्देपहिली सभा जावडेकरांची: काँग्रेसजनांना प्रतिक्षा उमेदवाराची

पुणे: उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसच्या तुलनेत भारतीय जनता पाटीर्ने आघाडी घेतली. आता पहिली प्रचारसभा घेण्यातही तेच पुढे होत आहेत. गिरीश बापट यांच्या प्रचाराची पहिलीच जाहीर सभा मंगळवारी (दि. २६) कोथरूड येथे शिक्षकनगर सोसायटीमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता होत आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर या सभेतील प्रमुख वक्ते आहेत. काँग्रेसजन मात्र अजूनही उमेदवाराच्या प्रतिक्षेत आहेत.
भाजपाने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली व प्रचारालाही सुरूवात केली आहे. महापालिकेतील पक्षाच्या सर्व नगसेवकांची बैठक रात्री उशिरा एका सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यांच्याकडे त्यांच्या प्रभागातील प्रचाराचे नियोजन देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर नियुक्त कार्यकर्त्यांना मदत करण्यापासून ते प्रभागातील मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवण्याबाबत त्यांना सुचना देण्यात आल्या. स्वत: बापट यांनी सर्व नगरसेवकांबरोबर संवाद साधला व त्यांच्याकडून माहिती घेतली.
काँग्रेसच्या शहर शाखेनेही उमेदवार जाहीर झाला नसला तरीही प्रचाराचे नियोजन केले आहे. शहरातील प्रमुख पदाधिकाºयांनी बैठक घेत प्रचाराचे नियोजन केले आहे. राज्य व केंद्रीय शाखेकडे वक्त्यांची मागणी नोंदवली आहे. मात्र अजून पक्षाकडून उमेदवारच जाहीर झालेला नसल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. 

Web Title: The BJP's campaign in Pune start , the Congress is still on waiting mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.