भाजप शहराध्यक्ष एंजटगिरी करु नका : अरविंद शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:32 PM2018-06-27T13:32:10+5:302018-06-27T13:33:40+5:30

शहराध्यक्षांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्यावे. निविदा आणि ठेकेदारीत लक्ष घालुन एंजटगिरी करु नये असा सल्ला काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी दिला आहे.

BJP city president Do not agentgiri : Arvind Shinde | भाजप शहराध्यक्ष एंजटगिरी करु नका : अरविंद शिंदे 

भाजप शहराध्यक्ष एंजटगिरी करु नका : अरविंद शिंदे 

Next
ठळक मुद्देमहापौरांवर अशा प्रकारे दबाब आणणे अत्यंत चुकीचे  

पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भाजपच्या शहर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन काही खाजगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविला होता. यामध्ये फोर्स कंपनीने दिलेल्या प्रस्तावावर पीएमपीएलकडून चार दिवसांत अभिप्राय मागविण्यात आला होता. परंतु, याकडे पीएमपीएलने दुर्लक्ष केल्याने भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापौरांना पीएमपीएलच्या कोणत्याही प्रस्तावांवर निर्णय न घेण्यास सांगुन दमबाजी केली आहे. महापौर शहराच्या आहेत, हे त्यांनी विसरू नये.  शहराध्यक्षांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्यावे. निविदा आणि ठेकेदारीत लक्ष घालुन एंजटगिरी करु नये, असा सल्ला काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. 
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने विविध उद्योग समूहांकडून प्रस्ताव आणि सूचना मागविल्या होत्या. या आवाहानाला प्रतिसाद देत फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीकडून एक महिन्यापूर्वी पुणे स्टेशन ते कोथरुड, स्वारगेट ते कोथरुड, पुणे स्टेशन ते वडगाव शेरी या तीन मार्गावर कंपनीच्या माध्यमातुन एसी मिनी बस सेवा देण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात आला होता. या बसची वारवारंता ७ ते १० मिनिटांची असेल, यामध्ये पीएमपीएला कोणतीही गुंतवणुक नसेल, मनुष्यबळाची गुंतवणूक आॅपरेटर स्टेक होल्डरच्या वतीने पुरविले जाणार, या बसेसवरील जाहिराती आॅपरेटर स्टेक होल्डरकडे राहणार, तीन महिन्यानंतर रेव्हेन्यू शेअरिंग करण्यात येईल, असा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर चार दिवसांत अभिप्राय देण्याच्या महापालिका आयुक्तांनी सूचना देऊन देखील पीएमपीएल प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे  पीएमपीएलच्या कारभारावर नाराज झालेले भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापौर मुक्ता टिळक यांना लेखी पत्र देऊन पीएमपीएलच्या कोणत्याही प्रस्तावांवर निर्णय न घेण्यास सांगितले. 
    याबाबत अरविंद शिंदे म्हणाले, यांनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या नावाखाली भाजपजे शहराध्यक्ष गोगावले हे महापालिकेच्या कामकाजात ढवळाढवळ करत आहेत. महापौरांना असे आदेश देणे योग्य नाही, त्या शहराच्या महापौर असतात पक्षाच्या नाहीत. त्यामुळे महापौरांवर अशा प्रकारे दबाब आणणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.  गोगावले यांनी संघटनात्मक कामात लक्ष घालावे. ठेकेदारीत लक्ष घालु नये. त्यासाठी भाजपचे पालिकेतील पदाधिकारी आहेत असा टोला शिंदे यांनी मारला.
-----------------------
अध्यक्ष तुम्हीसुद्धा.... 
महापालिकेतील भाजप भ्रष्टाचाराने बरबटली असताना आता भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी खाजगी कंपनीसाठी दलाली सुरु केली आहे.  शहराध्यक्षांनी पक्ष संघटनेचे काम करणे अपेक्षित असताना ते दलालीच्या रेसमध्ये उतरले आहेत. त्यामुळे ते हातात छडी घेउन त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांवर कसे अंकुश ठेवणार हा यक्ष प्रश्न आहे. आगामी काळात पुणेकरच हातात छडी घेतील. या भ्रष्टाचारी भाजपला हद्दपार करतील असा टोला विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी लगावला आहे.  

Web Title: BJP city president Do not agentgiri : Arvind Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.