पुण्यात ‘बिम्सटेक’चा पहिला लष्करी युध्द सराव सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 05:48 PM2018-09-10T17:48:14+5:302018-09-10T17:55:17+5:30

दहशतवाद सर्व जगाची गंभीर समस्या आहे. त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले आहे.

BIMSTEC started its first military war practice In Pune | पुण्यात ‘बिम्सटेक’चा पहिला लष्करी युध्द सराव सुरू 

पुण्यात ‘बिम्सटेक’चा पहिला लष्करी युध्द सराव सुरू 

Next
ठळक मुद्देनेपाळकडून ऐनवेळी माघार; पाचच देशांचा सहभाग सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रध्वजांना चिताह या हेलिकॉप्टरच्या फ्लाइंग पासच्या माध्यमातून सलामी

पुणे : बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अ‍ॅँण्ड इकॉनॉमिक को-आॅपरेशन (बिम्सटेक) च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी पुण्यात ‘मिलेक्स १८ या पहिल्या लष्करी युध्द सराव घेण्यात येत आहे. त्याचा  प्रारंभ आज (दि.१०) औंध येथील मिलिटरी स्टेशनवर मराठा लाइट इंन्फ्रटीचे प्रमुख मेजर जनरल संजीव शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाला. दरम्यान, या सरावात सहभागी न होण्याचा निर्णय नेपाळने ऐनवेळी घेतला. या सरावात सहभागी न होण्याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. 
 सदस्य राष्ट्रांच्या लष्करी तुकडयांचा सहभाग असलेल्या संचलनाचे नेतृत्व गोरखा बटालियनच्या गौरव शर्मा यांनी केले. आजपासून पुढील सहा दिवस हा सराव असणार आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी या सरावाचा समारोप होईल. याप्रसंगी भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे, सर्व सहभागी राष्ट्रांचे लष्करप्रमुख उपस्थित राहणार आहेत. 
याप्रसंगी मेजर जनरल शर्मा म्हणाले, दहशतवाद हा सर्व जगाची गंभीर समस्या आहे. त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले आहे. त्याचा दहशतवादाचा सामना करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. 
या लष्करी सरावात भारत, भूतान, बांग्लादेश, म्यानमार आणि श्रीलंका या राष्ट्रांच्या सैनिकी तुकडयांचा सहभाग आहे. थायलंडतर्फे एक निरीक्षक तुकडी सहभागी झाली असून, ते प्रत्यक्ष युद्ध सराव न करता केवळ निरीक्षण करणार आहेत. प्रत्येक देशाकडून ३० जणांची तुकडी यात सहभागी झाली आहे. 
----------- 
नेपाळचा सहभाग नसल्याने अनेक तर्कवितर्क 
या युध्द सरावात नेपाळही सहभागी होणार होता. परंतु, ऐनवेळी त्यांनी यातून माघार घेतली. बिम्सटेकच्या स्थापनेवेळी लष्करी सरावाचा करार झाला नव्हता. त्यामुळे यात सहभागी होऊ शकत नाही, असे नेपाळकडून सांगण्यात आले आहे. परंतु, या सरावात त्यांचे अधिकारी निरीक्षक म्हणून सहभागी होणार आहेत. नेपाळच्या या भूमिकेमागे चीनचा दबाव असल्याचेही बोलले जात आहे. 
--------------- 
 हेलिकॉप्टरद्वारे सलामी 
लष्कराच्या महार रेजीमेंटच्या बॅण्डपथकाद्वारे सादर केलेल्या कदम कदम बढाए जा या गाण्याच्या चालीवर जवानांकडून संचलन केले. तसेच बिम्सटेक संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रध्वजांना चिताह या हेलिकॉप्टरच्या फ्लाइंग पासच्या माध्यमातून सलामी देण्यात आली.  

Web Title: BIMSTEC started its first military war practice In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.