लोकसभा निवडणूक निकाल पाहण्यासाठी '' बिग स्क्रिन '' ची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 12:45 PM2019-05-22T12:45:50+5:302019-05-22T12:55:33+5:30

भाजपाचे नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडून बुधवार पेठेतील काका हलवाई दुकानासमोरील कोतवाल चावडी येथे मोठी स्क्रिन लावण्यात येणार आहे.

"Big Screen" system to see the results of Lok Sabha elections | लोकसभा निवडणूक निकाल पाहण्यासाठी '' बिग स्क्रिन '' ची व्यवस्था

लोकसभा निवडणूक निकाल पाहण्यासाठी '' बिग स्क्रिन '' ची व्यवस्था

Next
ठळक मुद्देनगरसेवकाकडून सुविधा तब्बल ३५० किलो पेढ्यांची दिली ऑर्डरमोदी आणि भाजपावर कडाडून हल्ला चढवणाऱ्या कॉंग्रेसलाही विजयाची खात्री

पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. २३) होणार असून यासाठी कॉंग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आदी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तयारी करीत आहेत. निकालांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी '' बिग स्क्रिन '' ची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपाचे नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडून बुधवार पेठेतील काका हलवाई दुकानासमोरील कोतवाल चावडी (दगडूशेठ गणपती उत्सवमंडप जागा) येथे ही मोठी स्क्रिन लावण्यात येणार आहे.  
भाजपाकडून अब की पार ३०० के पार असा नारा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेमुळे भाजपाला विजय निश्चित मिळेल असे भाजपाचे मत आहे. तर दुसरीकडे राफेलसह विविध मुद्यांवर मोदी आणि भाजपावर कडाडून हल्ला चढवणाऱ्या काँग्रेसही विजयाची खात्री आहे. देशातील जनता भाजपावर नाराज असल्याचे काँग्रेसचे मत आहे. त्यामुळे दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. दोन्ही बाजुने निकाल पाहण्यासाठी नियोजन सुरु आहे. 
नगरसेवक रासने यांनी नागरिकांना मोठ्या पडद्यावर दिवसभर हे निकाल पाहता यावेत अशी व्यवस्था केली आहे. गुरुवारी सकाळपासून पुणेकरांना निवडणूक मतमोजणीचे थेट प्रक्षेपण पाहता यावा, याकरीता मोठी स्क्रिन लावण्यात येणार आहे. रासने यांनी ३५० किलो पेढयांची ऑर्डरही देऊन ठेवली आहे. याठिकाणी दिवसभरात भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 

Web Title: "Big Screen" system to see the results of Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.