पुण्यातील भिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 08:30 PM2018-07-18T20:30:27+5:302018-07-18T20:46:12+5:30

भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याने त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. महापालिकेसमोर असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठीही सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल.

Bhide wada will be National museum | पुण्यातील भिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक

पुण्यातील भिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक

ठळक मुद्देनागपुरात गिरीश बापट यांची घोषणा : राज्य सरकारचे महापालिकेला आदेशभिडे वाड्याची पाहणी करून त्याचा मास्टर प्लॅन तयार केला जाणार राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागालाही तशा स्पष्ट सुचना

पुणे:  नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात स्त्री शिक्षणाचे उगमस्थळ अर्थातच भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक होणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली . हे राष्ट्रीय स्मारक असेल. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी सरकार घेईल. महापालिकेसमोर असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठीही सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागालाही तशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. भूसंपादन करण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालय मदत करेल. स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी नामवंत कलाकारांकडून कल्पना मागवण्यात येतील. देशाला उर्जा देणारे स्थळ म्हणून या स्मारकाची गणना होईल असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला. 
--------------
राज्य सरकारने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. महापालिकेसमोर काही अडचणी होत्या. त्या आता दूर होतील. आद्य स्त्रिशिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी समस्त महिला वर्गाच्या आदर्श आहेत. स्मारकातून त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. महापालिकेकडूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल.
मुक्ता टिळक, महापौर
.........................
महापालिकेच्या वारसास्थळांच्या यादीत भिडे वाड्याचा समावेश आहेच. काही वर्षे त्यासाठी निधीची तरतुदही होत आहे. यापुर्वी एकदा स्मारक करण्यासाठी प्रयत्न झाला होता, मात्र, भूसंपादनात काही अडचणी आल्यामुळे तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आता सरकारने निर्णय घेतल्यामुळे अडचण येणार नाही असा विश्वास बाळगायला हरकत नाही.
शाम ढवळे- निवृत्त अभियंता व हेरिटेज विभागप्रमुख, महापालिका
-----------------
सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. भिडे वाड्याची पाहणी करून त्याचा मास्टर प्लॅन तयार केला जाईल. त्यापूर्वी वाड्याची पाहणी करणे गरजेचे आहे. पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक यांचा सहभाग आराखडा तयार करताना घेतला जाईल. वाडा वारसास्थळांच्या यादीत असल्याने आता कसली अडचण येणार नाही. हर्षदा शिंदे- हेरिटेज विभाग प्रमुख अभियंता, महापालिका

Web Title: Bhide wada will be National museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.