भगतसिंग यांना अभिवादन करण्यास विद्यापीठात मज्जाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:35 PM2018-03-24T22:35:08+5:302018-03-24T22:35:08+5:30

कार्यक्रमाला सुरूवात करण्यापूर्वीच विद्यापीठातील सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी याठिकाणी कार्यक्रम घेता येणार नाही असे विद्यार्थ्यांना सांगितले.

Bhagat Singh greeting programme prevented in univercity | भगतसिंग यांना अभिवादन करण्यास विद्यापीठात मज्जाव 

भगतसिंग यांना अभिवादन करण्यास विद्यापीठात मज्जाव 

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी भगतसिंग यांनी लिहिलेल्या ‘विद्यार्थी आणि राजनिती’ लेखाचे वाचन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याची विद्यार्थ्यांकडून भावना व्यक्त

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शहीद दिनानिमित्त विद्यार्थी शहिद भगतसिंग यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी रात्री एकत्र जमले होते. तेव्हा त्यांना पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केला. त्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडियाच्यावतीने (एनएसयूआय) शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृती दिनानिमित्त अनिकेत कॅन्टीनजवळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र कार्यक्रमाला सुरूवात करण्यापूर्वीच विद्यापीठातील सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी याठिकाणी कार्यक्रम घेता येणार नाही असे विद्यार्थ्यांना सांगितले. शांततेमध्ये कार्यक्रम घेण्यासही प्रशासनाकडून अटकाव केला जात असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी एनएसयूआयचा सतीश गोरे , अमीर पठाण , मुक्तीवादीचे आकाश दौंडे, सतीश पवार रुकसाना कदम, मोहिनी जाधव, सुरेश साबळे, अक्षय रगतवान, अक्षय ओहळ, प्रदीप व इतर सहकारी विद्यार्थी उपस्थित होते. 
 ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या कृतीचा विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भगतसिंग यांनी लिहिलेल्या ‘विद्यार्थी आणि राजनिती’ लेखाचे वाचन केले.  
 

Web Title: Bhagat Singh greeting programme prevented in univercity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.