उन असह्य हाेतंय, तर मग पुण्याजवळील या सात ठिकाणांना जरुर भेट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 07:45 PM2018-03-29T19:45:47+5:302018-03-29T19:45:47+5:30

उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झाला असाल, अाणि कुठेतरी थंड ठिकाणी जायची इच्छा असेल. तर पुण्याजवळील हि सात ठिकाणे तुमची इच्छा जरुर पुर्ण करतील.

best seven places to visit in summer | उन असह्य हाेतंय, तर मग पुण्याजवळील या सात ठिकाणांना जरुर भेट द्या

उन असह्य हाेतंय, तर मग पुण्याजवळील या सात ठिकाणांना जरुर भेट द्या

googlenewsNext

पुणे : राज्यातील शहरांच तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं अाहे. पुण्याचा पाराही तब्बल 40 अंशापर्यंत गेला हाेता. त्यामुळे उन्हाच्या या कडाक्याला कंटाळला असाल, अाणि थंड ठिकाणी जाण्याची इच्छा असेल, तर पुण्याजवळील या सात ठिकाणांना जरुर भेट द्या. 

महाबळेश्वर 
महाराष्ट्रातील काश्मीर अशी महाबळेश्वरची अाेळख अाहे. थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ख्याती सगळीकडे अाहे. साेबतच निसर्गाचा अद्भूत नजराणा येथे पाहायला मिळताे. येथील सनसेट व सनराईज पाईंट पर्यटकांच्या विशेष पसंतीचा अाहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं महाबळेश्वर पर्यटकांना नेहमीच खुणावत असतं. येथील स्ट्राॅबेरी विशेष फेमस अाहे. पुण्यापासून 120 किलाेमीटर अंतरावर असलेल्या महाबळेश्वरला तुम्ही अद्याप गेला नसाल तर या उन्हाळ्यात जरुर भेट द्या. 

पाचगणी
महाबळेश्वरच्या वाटेतच पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण लागते. येथील उत्तम हवामानासाठी पाचगणी अाेळखले जाते. पुण्यापासून अवघ्या शंभर किलाेमीटरवर पाचगणी अाहे. तुम्ही महाबळेश्वरचा प्लॅन करत असाल, तर पाचगणीला रस्त्यात थांबू शकता. टेबल लॅंड, सिडनी पाॅईंट येथील काही फेमस पाईंट अाहेत. 

माथेरान
निसर्गाच्या जवळ जाण्याचा सर्वाेत्तम मार्ग म्हणजे माथेरान, भारतातील पहिले वाहतुकीपासून मुक्त हिल स्टेशन म्हणून माथेरान अाेळखले जाते. येथे अाल्यानंतर तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत हरवून जाता. टाॅय ट्रेनचा प्रवास पर्यटकांसाठी अानंददायी असताे. पुण्याहून 125 किलाेमीटर अंतरावर हे ठिकाण अाहे. 

लाेणावळा- खंडाळा
पुणेकरांच अाणि मुंबईकरांच अावडतं डेस्टिनेशन म्हणजे लाेणावळा-खंडाळा. तरुणांना लाेणावळा नेहमीच खूनावत असतं. जवळच कार्ला अाणि भाज्या लेणी असल्याने फॅमिली ट्रिपसाठी सुद्धा उत्तम असं हे ठिकाण अाहे. पुण्यापासून अवघ्या 2 तासांवर लाेणावळा अाहे. ट्रेकर, बाईकर तरुणांच्या अावडीचं असं हे ठिकाण अाहे. 

मुळशी
वन डे पिकनिकसाठी मुळशी हा चांगला पर्याय अाहे. दूरवर पसरलेलं निसर्गसाैंदर्य अाणि मुळशी धरण तुम्हाला नक्कीच अावडेल. पुण्यातून अवघ्या एक ते दीड तासात तुम्ही येथे पाेहचू शकता. येथील वातावरण बाराही महिने अल्हाददायक असते. 

पानशेत
तुम्हाला बाेटींगचा अानंद घ्यायचा असेल तर पानशेतचा अाॅप्शन तुमच्याकडे अाहे. तुम्ही या ठिकाणी मनसाेक्त बाेटिंग करु शकता. त्याचबराेबर पिठलं भाकरीचा अास्वादही तुम्ही या ठिकाणी चाखू शकता. कुटुंबासाेबतच्या एक दिवसाच्या ट्रिपसाठी पानशेत हा चांगला अाॅप्शन अाहे. पुण्यापासून 50 किलाेमीटर अंतरावर हे धरण अाहे. 

खडकवासला
अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या खडकवासल्याला तुम्ही कधीही भेट देऊ शकता. खडकवासला धरणाच्या किनारी संध्याकाळी असणारं अल्हाददायक वातावरण मन प्रसन्न करतं. येथील कांदाभजी सुद्धा पर्यटकांमध्ये अावडीची अाहेत. विकेंडला येथे माेठी गर्दी असते. पुण्यापासून फार लांब जायचे नसेल तर खडकवासला उत्तम पर्याय अाहे. 

Web Title: best seven places to visit in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.