पुण्यातील स्ट्रीट शॉपिंगसाठी ही ठिकाणं आहेत सर्वात लय भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 12:25 AM2017-11-19T00:25:01+5:302017-11-19T20:27:01+5:30

पुण्यात जाणार असाल आणि शॉपिंगचाही प्लॅन आहे तर याठिकाणीच नक्की जा

best places in pune for street shopping | पुण्यातील स्ट्रीट शॉपिंगसाठी ही ठिकाणं आहेत सर्वात लय भारी

पुण्यातील स्ट्रीट शॉपिंगसाठी ही ठिकाणं आहेत सर्वात लय भारी

googlenewsNext
ठळक मुद्देतुम्हाला जर फक्त ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्याची सवय असेल तर पुण्यातील ही शॉपिंग स्ट्रीट तुमच्यासाठीच आहे

पुणे - माणसांकडे कितीही पैसे असले तरी स्ट्रीट शॉपिंग करण्यात जी मजा आहे ती इतर कोणत्याच मॉलमध्ये येत नाही. म्हणूनच प्रत्येक शहरात गजबजलेली मार्केट असतात. अशा मार्केटमधून आपण सारं काही विकत घेऊ शकतो. दुकानदाराने सांगितलेल्या किंमतीत वस्तू घेतल्या तर शॉपिंग केल्यासारखं वाटतच नाही. म्हणून निदान थोडंफार तरी बार्गेनिंग करून महिला मंडळ शॉपिंग करतात. मॉलमध्ये किंवा शॉपिंग सेंटरमध्ये बार्गेनिंगला सोयच नसते. त्यामुळे शॉपिंगचा यथेच्छ आनंद उपभोगायचा असेल तर रस्त्यावरची शॉपिंगच बेस्ट मानली जाते. एखाद्या रस्त्यावरची दहा-बारा स्टॉल्स पालथी घातल्यावर कुठे आपण एखाद-दुसरी वस्तू खरेदी करतो. त्यामुळे शॉपिंग करताना कसं आजूबाजूला अनेक दुकानं हवीत, गजबजाट हवा, तरच शॉपिंगला मजा. पुण्यातही अशा बऱ्याच शॉपिंग स्ट्रीट आहेत, ज्याठिकाणी तुम्हाला अगदी कमी किंमतीत शॉपिंग करता येते.

फर्ग्युसन कॉलेज रोड

फर्ग्युसन कॉलेज रोडवर अनेक कपड्यांची दुकानं आहेत. फॅशन विश्वात येणारे नवनवे ट्रेंड तुम्हाला याठिकाणी हमखास मिळतील. रस्त्यावर स्टॉल्स तर आहेतच, पण शॉपिंग सेंटरही असल्याने, स्ट्रिट शॉपिंगपासून ते शोरूम शॉपिंगपर्यंत सगळ्याच शॉपिंगचा तुम्ही इकडे आनंद घेऊ शकता. याठिकाणी अनेक कॉफी शॉप, रेस्टॉरंट, सबवे, माँजिनिज असल्याने शॉपिंग झाल्यावर भरपेट खाण्याचीही सोय उपलब्ध आहे. तुम्ही पुस्तकप्रेमी असाल तर उत्तमच. कारण इकडे अनेक पुस्तकांचीही दुकानं सापडतात. हा परिसर कॉलेज एरिया असल्याने तरुण मंडळीची जास्तप्रमाणा ये-जा सुरू असते.

हाँग काँग लेन

कपड्यांव्यतिरिक्त जर तुम्हाला इतर वस्तू घ्यायच्या असतील तर हाँग काँग लेन बेस्ट आहे. डेक्कनच्या गरवारे ब्रिजजवळ हाँग काँग लेन आहे. तिकडे तुम्हाला दागिने, पर्स, फुटवेअर यांचे विविध पर्याय मिळू शकतील. फॅशन जगात इन असलेल्या अनेक अॅक्सेसरीजही इकडे मिळतात. सध्या काय ट्रेडिंग आहे हे पाहण्यासाठीही काही तरुण मंडळी या मार्केडमध्ये फेरफटका मारताना दिसतात. अनेक कलाकुसर केलेले दागिने पाहण्यासाठी आणि घेण्यासाठी महिला वर्गाची इकडे नेहमीच गर्दी होते. 

फॅशन स्ट्रीट

पुणेकरांसाठी हक्काची शॉपिंगची जागा म्हणजे फॅशन स्ट्रीट. मुंबईत ज्याप्रमाणे फॅशन स्ट्रीट आहे, त्याचप्रमाणे पुण्याची ही फॅशन स्ट्रीट. जीन्स,लेगिंग्ज, कुर्ता, दागिने अशा विविध गोष्टींसाठी पुणेकर इकडे येतात. लहान बजेटमध्ये तुम्हाला भरपूर शॉपिंग करायची असेल तर फॅशन स्ट्रीटला एकदा नक्कीच भेट द्या. खरंतर इतर लोकल मार्केटप्रमाणे इकडेही किंमती जरा वाढवून सांगितली जाते. मात्र गिऱ्हाईंकाच्या म्हणण्याप्रमाणे किंमत कमीही केली जाते. त्यामुळे किंमत कमी करण्याचं कौशल्य तुमच्यात असेल तर या ठिकाणी तुमचं कौशल कामाला येऊ शकतं. 

महात्मा गांधी रोड

तुम्हाला जर फक्त ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्याची सवय असेल तर पुण्यातील महात्मा गांधी रोडवरील शॉपिंग स्ट्रीट तुमच्यासाठीच आहे. इकडे अनेक स्टॉल्सवर मोठ मोठ्या ब्रॅण्डचे कपडे, दागिने, कॉस्मेटिक्स मिळतात. ब्युटिकसाठीही महिलामंडळ इकडे येत असतं. आजूबाजूला अनेक मिठाईची दुकानं, हॉटेल्स असल्याने मनभरुन शॉपिंग झाल्यावर पोट भरण्यासाठी तुम्ही या हॉटेल्समधून येऊन ताव मारू शकता.

तुळशी बाग

घरगुती सामानांसाठी शॉपिंग करायची असेल तर तुळशी बाग हा एक उत्तम पर्याय आहे. या मार्केटमध्ये जरा जास्तच गजबजाट असतो. गर्दीही अधिक असते. पण तुळशी बागेच्या आसपास राहणारी सगळीच मंडळी इकडे खरेदीसाठी येत असतात. केवळ घरगुती सामानांसाठीच हे मार्केट प्रसिद्ध नसून महिलावर्ग साड्या खरेदी करण्यासाठीही इकडे येत असतात. त्यामुळे या बाजारात कायम गर्दीच सापडते.

Web Title: best places in pune for street shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.