‘बंगाली पोस्टर बाबां ’ मुुळे पीएमपी हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:18 PM2019-04-18T16:18:05+5:302019-04-18T16:54:02+5:30

मागील काही महिन्यांपासून हे प्रमाण वाढले असून बंगाली बाबांचा आकडा जवळपास २० च्या घरात गेला आहे. 

'Bengali Poster of baba person advertise funda problem to pmp | ‘बंगाली पोस्टर बाबां ’ मुुळे पीएमपी हैराण 

‘बंगाली पोस्टर बाबां ’ मुुळे पीएमपी हैराण 

Next
ठळक मुद्देतंत्र-मंत्राच्या जाहिरातींचा ऊत : पोलिसांकडे तक्रार करून कारवाई नाहीया बाबांवर जादुटोणा विरोधी कायदा व मालमत्ता विदूपण कायद्यांर्गत कारवाई होणे आवश्यक बसमधील जाहिराती काढण्यासाठी पीएमपी ला स्वतंत्र कर्मचाऱ्यांची करावी लागते नियुक्ती

पुणे : पती-पत्नीतील भांडण, व्यवसायातील मंदी, गृहकलह, प्रेमविवाह अशा एक ना अनेक समस्यांपासून केवळ काही तासांत मुक्ती मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या बंगाली बाबांच्या पोस्टरने पीएमपी प्रशासन हैराण झाले आहे. दुआ और ताबीज से तकदीर बदलने वाले, जटील से जटील समस्याओं ३ घंटा में तूफानी समाधान या स्वरूपाची जाहिरात करून नागरिकांना भुलविले जात आहे. मागील काही महिन्यांपासून हे प्रमाण वाढले असून बंगाली बाबांचा आकडा जवळपास २० च्या घरात गेला आहे. 
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ची बसस्थानके व बसमध्ये अशाप्रकारच्या जाहिरातील चिटकविल्या जातात. बसने प्रवास करताना खिडकीजवळ बसणाऱ्या प्रवाशांना पुण्यनगरीचे दर्शन घडण्याऐवजी बंगाली बाबांच्या पोस्टरचे दर्शन घडते. तसेच बसमध्ये अन्यत्रही या जाहिराती दिसतात. यामुळे बस व स्थानकांचे विद्रुपीकरण होत आहे. पीएमपी प्रवासी मंचचे कार्यकर्ते निलकंठ मांढरे हे याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील पाच-सहा महिन्यांपूर्वी तीन-चार बाबांचेच स्टीकर्स बसमध्ये दिसत होते. आता हा आकडा जवळपास १९ पर्यंत वाढला आहे. त्यामुळे थेट चमत्कार करून समस्या सोडविण्याचा दावा केला जात आहे. समस्येचे समाधान करण्याचे प्रत्येक बाबाचे तासही वेगवेगळे आहेत. सर्व जाहिरातींवर एक-दोन मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत.
या जाहिरातील काढताना पीएमपी प्रशासनही हैराण झाले आहे. बसमधील जाहिराती काढण्यासाठी पीएमपी ला स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. त्या लवकर निघत नसल्याने अर्धवट स्वरूपात ठेवल्या जातात. त्यामुळे बस, स्थानके विद्रुप दिसतात. मांढरे यांनी याबाबत पीएमपीकडे अनेकदा तक्रार केली आहे. मात्र, त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. काही आगारांमधून पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यावरही कारवाई केली जात नाही. केवळ पोलिसांकडे तक्रार देण्याते सोपस्कर पार पाडले जात आहेत. या बाबांवर जादुटोणा विरोधी कायदा व मालमत्ता विदूपण कायद्यांर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. पण अद्याप एकाही बाबावर कारवाई झालेली नाही, असे मांढरे यांनी सांगितले.
---
बस व स्थानकांवर लावलेल्या अनधिकृत जाहिराती सातत्याने काढल्या जातात. आगार प्रमुखांकडून याबाबत पोलिसांत तक्रारही केली जाते. रात्रीच्या वेळी किंवा बसस्थानकात बस उभी असताना काही जण या जाहिराती लावतात. त्यामुळे त्यांना पकडणे शक्य होत नाही.
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी
........
- निलकंठ मांढरेहे आहेत काही बंगाली बाबा
- बाबा खान बंगाली
- गुरू मूसा खान बंगाली
- बाबा रजा खान बंगाली
- गुरू मूशा जी
- पाशा बंगाली
- गुरू सिकंदर बंगाली
- गुरू माहन्त अघोरी
-------------
साईबाबांचा आधार
बहुतेक जाहिरातींवर साईबाबांच्या छायाचित्रांचा गैरवापर केला जात आहे. या माध्यमाधून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच विविध धर्मांच्या प्रतिकांचाही वापर केला जात आहे. मागील काही महिन्यांत या बाबांच्या जाहिरातील वाढल्या आहेत. यामुळे बसचे विद्रुपीकरण होत असून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

Web Title: 'Bengali Poster of baba person advertise funda problem to pmp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.