दक्षिण कोरियाच्या पर्यटकांवर पुण्यातील तुळजा लेण्यांमध्ये मधमाशांचा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 07:48 PM2018-02-05T19:48:51+5:302018-02-05T19:52:01+5:30

जुन्नरजवळील तुळजा लेणीसमूहात लेण्यांच्या अभ्यासासाठी आलेल्या दक्षिण कोरियातील पर्यटकांवर येथील लेण्यांमध्ये असणा-या मधमाशांनी हल्ला चढविला. त्यांच्यावर जुन्नरमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

Bee attack among South Korean tourists in Tulja Caves in Pune | दक्षिण कोरियाच्या पर्यटकांवर पुण्यातील तुळजा लेण्यांमध्ये मधमाशांचा हल्ला 

दक्षिण कोरियाच्या पर्यटकांवर पुण्यातील तुळजा लेण्यांमध्ये मधमाशांचा हल्ला 

Next

जुन्नर : जुन्नरजवळील तुळजा लेणीसमूहात लेण्यांच्या अभ्यासासाठी आलेल्या दक्षिण कोरियातील पर्यटकांवर येथील लेण्यांमध्ये असणा-या मधमाशांनी हल्ला चढविला. त्यांच्यावर जुन्नरमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. 

या डोंगर रांगेत अंबाआंबिका, मानमोडी तसेच भूत लेणी असे तीन लेणीसमूह आहेत. या ठिकाणी ऐकून २१ पर्यटक आले होते. तर भूत लेणीमध्ये लेण्यांच्या अभ्यासासाठी गेलेल्या ७ पर्यटकांवर याठिकाणी लेण्यांच्या छताला असणा-या मधमाशांच्या पोळ्यातील मधमाशा विचलित झाल्याने हल्ला चढविला. मधमाशांच्या  चाव्याने त्रस्त झालेल्या या पर्यटकांनी  लेण्यांमधून पळ काढला. 

वनविभागाचे रमेश खरमाळे, पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या पर्यटकांना छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी जखमी पर्यटकांवर प्राथमिक उपचार करण्यात आल. हे पर्यटक दोन दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आले होते. इम याँग हुन (४३), किम चँग क्यून (६४), चो यून शो(२१), कौन पिल सून(४७), ज्वान जीन बुंग (२७), शिन ह्युन ही(६७), जो सुंग मी (४९) अशी या पर्यटकांची नावे आहेत. 

तालुक्यात संख्यात्मक दृष्टीने महाराष्ट्रात सर्वात जास्त लेणी समूह  आहेत. परंतु लेण्यांची विशेष देखभाल नसल्याने याठिकाणी काही लेण्यांमध्ये छतावर मोठ्या प्रमाणात आग्या  मोहळाच्या मध माशांची घरटी केली आहेत. लेण्यांमध्ये गेल्यावर याठिकाणी, गोंगाट  करणे, धूर करणे, फोटो काढण्यासाठी फ्लॅशचा वापर केल्यास याठिकाणी मधमाशा चवताळून पर्यटकांवर हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. 

Web Title: Bee attack among South Korean tourists in Tulja Caves in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.