बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर बाभळीच्या झाडांची साल काढून विकणारी टोळी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 01:58 PM2019-06-27T13:58:11+5:302019-06-27T14:07:12+5:30

बारामती-इंदापूर राज्य महामार्गाच्या कडेने असणारे वृक्ष माथेफिरूंचे लक्ष्य बनले आहे.

Baramati-Indapur State Highway gang activated of trees destroyed | बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर बाभळीच्या झाडांची साल काढून विकणारी टोळी सक्रिय

बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर बाभळीच्या झाडांची साल काढून विकणारी टोळी सक्रिय

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : हातभट्टी दारूच्या निर्मितीसाठी झाडांची कत्तलरस्त्याच्या कडेने शेकडोवर्षांपूर्वीचे वृक्ष: देशीबाभूळ, वड, कडूनिंब यासारखे मोठ्याप्रमाणात

बारामती : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष वृक्षसंपदेच्या मुळावर आले आहे. बारामती-इंदापूर राज्य महामार्गाच्या कडेने असणारे वृक्ष माथेफिरूंचे लक्ष्य बनले आहे. आता तर दिवसाढवळ्या या वृक्षांचे अपरिमित नुकसान केले जात आहे. 
रस्त्याच्या कडेने शेकडोवर्षांपूर्वीचे वृक्ष आहेत. यामध्ये देशीबाभूळ, वड, कडूनिंब यासारखे देशी वृक्ष मोठ्याप्रमाणात आहेत. सोमवारी (दि. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास बेलवाडी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीतील खारओढा येथे दोन ते तीन भुरटे चोर देशी बाभळीच्या झाडांची साल काढताना येथील जागरूक नागरिकाला अढळून आले. संबंधित नागरिकाने या चोरट्यांना हटकले असता त्यांनी काढता पाय घेतला. हे भुरटे चोर मोटारसायकल, कुऱ्हाड तसेच पिशवीमध्ये बाभळीची साल घेऊन पसार झाले. देशी बाभळीची साल काही मद्यपी व भुरटे चोर दिवसाढवळ््या काढून नेतात. यामुळे बाभळीचे झाड काही दिवसात जळून जाते.

 इंदापूर तालुक्यातील लासुर्णे, बेलवाडी, अंथुर्णे, सणसर, शेळगाव या परिसरात बाभळीच्या झाडांची साल काढणारी टोळी सक्रिय आहे. 
हातभट्टी दारू बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये देशी बाभूळ झाडाची साल महत्त्वाचा घटक आहे. बेकायदा हातभट्टीची दारू काढणारे व्यावसायीक देशी बाभळीची साल ५० रुपये किलोने घेतात. गावोगावी असणाºया या अवैध दारूधंद्यामुळे देशी बाभळीच्या झाडावर मात्र संक्रात आली आहे. मद्यपीदेखील विनासायास पैसे मिळत असल्याने बाभळीची साल काढून अवैध दारू व्यावसायीकांना विकत आहेत.  त्यामुळे बारामती-इंदापूर  राज्यमहामार्गाच्या कडेने असणारी झाडे धोक्यात आली आहेत. 

४रस्त्याच्या कडेने असणारी संपूर्ण वृक्षसंपदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आहे.  मागील दोन महिन्यांपूर्वी लासुर्णे (ता. इंदापूर) परिसरातील याच महामार्गाच्या कडेला असणारा वटवृक्ष मानवनिर्मित आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.  याबाबत वृत्तपत्रातून बातमी देखील प्रसिद्ध झाली. मात्र, संबंधितांना केवळ नोटीस देण्यापलीकडे बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या माथेफिरूचे धाडस वाढू लागले आहे. येथील झाडांना नुकसान पोहोचवणाºयांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
..........
ज्या ठिकाणी झाडांना इजा पोहोचवली गेली आहे, तेथे पाहणी करण्यासाठी कर्मचाºयांना पाठविणार आहे. तसेच, या रस्त्याच्या कडेने असणाºया झाडांना इजा पोहोचणार नाही, याची देखील काळजी घेऊ.- पी. व्ही. पंडित, उपअभियंता, भिगवण सार्वजनिक बांधकाम उपविभाग 

Web Title: Baramati-Indapur State Highway gang activated of trees destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.