योगाचार्य बी.एस.के. अय्यंगार यांच्या कन्या डॉ. गीता यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 12:45 PM2018-12-16T12:45:02+5:302018-12-16T14:11:58+5:30

योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या कन्या डॉ. गीता एस. अय्यंगार (वय 74) यांचे रविवारी सकाळी निधन झाले.

B. K. S. Iyengar's daughter Dr. Geeta Iyengar passed away | योगाचार्य बी.एस.के. अय्यंगार यांच्या कन्या डॉ. गीता यांचे निधन 

योगाचार्य बी.एस.के. अय्यंगार यांच्या कन्या डॉ. गीता यांचे निधन 

Next

पुणे : योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या कन्या डॉ. गीता एस. अय्यंगार (वय 74) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे. डॉ. गीता अय्यंगार यांनी वयाच्या अकराव्या वर्षांपासून योग विद्येचे शिक्षण घेतले. दरम्यान,  त्यांच्या आईचे 1973  मध्ये निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. रमनानी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्युट( पुणे) च्या त्या संचालक होत्या. या संस्थेची स्थापना 19 जानेवारी 1975 रोजी त्यांच्या वडिलांनी पुण्यात केली. या संस्थेत योगचे धडे दिले जातात. येथे योगविद्या संशोधन केंद्रदेखील आहे.  

गीता यांनी  त्यांच्या वडिलांकडून लहानपणीच योग शिकण्यास सुरुवात केली. १९६१ साली महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर, वडील परदेशांच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी वडिलांच्या जागी शिकविण्यास सुरुवात केली. वडिलांनी या कामातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी त्यांचे बंधू प्रशांत अय्यंगार यांच्यासोबत रमामणी अय्यंगार मेमोरिअल योग संस्थेचे काम बघण्यास सुरुवात केली.
वडील योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या जन्मशताब्दी निमित्त नुकताच पुण्यात कार्यक्रम घेण्यात आला. त्यात गीताताई यांनी 56 देशातील त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी 'योग-ए जेम फाँर वुमेन' हे पुस्तक देखील लिहिले आहे.

Web Title: B. K. S. Iyengar's daughter Dr. Geeta Iyengar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग