आंबोली घाटातील धबधबे पर्यटकांचे आकर्षणबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:45 PM2017-07-18T13:45:55+5:302017-07-18T13:45:55+5:30

दर्याघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या आंबोली येथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे तर शेतकरी अवनी करण्यात मग्न आहेत.

Attractions of tourist attractions of Amboli Ghatbe | आंबोली घाटातील धबधबे पर्यटकांचे आकर्षणबिंदू

आंबोली घाटातील धबधबे पर्यटकांचे आकर्षणबिंदू

Next
>ऑनलाइन लोकमत
जुन्नर, दि. 18 -   दर्याघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या आंबोली येथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे तर शेतकरी अवनी करण्यात मग्न आहेत.
शालेय विद्यार्थी पाऊस कितीही जोराचा असला तरी शाळेत जात आहेत. माळशेज घाट बंद असून पोलिसांची गस्त वाढल्याने पर्यटक नानेघाट व आंबोलीकडे वळलेत. पोलिसांकडून नानेघाटाकडे जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची तपासणी निरगुडे फाटा येथे केली जात आहे.
 
पावसाळी सहलीत मौज करण्यासाठी सर्वांचे प्लॅनिंग सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर जुन्नर, अकोले, माळशेज, आंबेगाव अशा ठिकाणी यावर्षी खूपच गर्दी पाहायला मिळत आहे. जसे झाडे, झुडपे, नद्या, धबधबे, प्राणी यांसारखा नैसर्गिक वारसा आपल्याला लाभला आहे. तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या आपल्या बांधवांची शेती, कला संस्कृतीचा वारसा आपल्याला लाभला आहे.
 
नाणेघाट, निमगिरी, भंडारदरा, भीमाशंकर इथल्या लोकांच मन इतक मोठं आहे की कुणाला मदतीला नाही म्हणत नाहीत, तुम्हाला फिरायला, मजा करायला आलेल्या लोकांना जेवण देतील, राहायला जागा देतील, आणि बदल्यात काही मागणारसुद्धा नाहीत. मात्र या मोठ्या मनाच्या लोकांना आपला त्रास होणार नाही याची काळजीही घ्यावी. 
 

Web Title: Attractions of tourist attractions of Amboli Ghatbe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.