Attempted to rape; A complaint was filed in the loni Kalbhor police, pune | विवाहित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल

ठळक मुद्दे२८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७-१५ वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार पीडित महिला मूळ कर्नाटक राज्यातील असून तिचे पती सौदी अरेबिया येथे करतात काम

लोणी काळभोर : घरात कोणीही नाही याचा गैरफायदा घेत ओळखीच्या विवाहित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७-१५ वाजण्याच्या सुमारास घडला असून याप्रकरणी सुधीर सूर्यवंशी (रा. खोरावडा फाटा, सोरतापवाडी, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळ कर्नाटक राज्यातील असून तिचे पती सौदी अरेबिया येथे काम करतात. सध्या ते घरी आलेले असून गेल्या १० वर्षांपासून सुधीर व त्यांची ओळख आहे. तिच्या लग्नाअगोदर तो तिच्याकडे प्रेमाची याचना करत होता. लग्नानंतरही तो तिला त्रास देत होता. ही बाब तिने पतीस सांगितली होती.
२८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरगुती कामानिमित्त तिचे पती घराबाहेर गेले होते. ती स्वयंपाक करत होती. ७:१५च्या सुमारास सुधीर सूर्यवंशी तेथे आला. त्याने मद्यप्राशन केले होते. आल्यानंतर त्याने तुझा पती पुन्हा सौदी येथे कामास केव्हा जाणार, अशी विचारणा केली. तिने घरात कशाला आलास, असे विचारले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन तो करू लागला. तिने प्रतिकार करताच तिला मारहाण करून त्याने दाराची कडी लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने केलेल्या आरडाओरडा यामुळे शेजारी जमा होत आहेत, हे पाहून तो आपल्या दुचाकीवरून पळून गेला.