कौटुंबिक न्यायालयातील वाहनतळ वकिलांसाठीच, भुयारी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 05:04 AM2017-11-19T05:04:39+5:302017-11-19T05:04:47+5:30

शिवाजीनगर न्यायालयाचे पालक न्यायाधीश असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, अनंत बदर आणि भूषण गवई यांनी पुढील आठवड्यात वाहनतळ आणि भुयारी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत केवळ वकिलांसाठी हे पार्किंग खुले राहील.

Assurances to start the subway, for family court parking advocates | कौटुंबिक न्यायालयातील वाहनतळ वकिलांसाठीच, भुयारी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन

कौटुंबिक न्यायालयातील वाहनतळ वकिलांसाठीच, भुयारी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन

Next

पुणे : कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीतील बहुप्रतीक्षित वाहनतळ खुले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाजीनगर न्यायालयाचे पालक न्यायाधीश असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, अनंत बदर आणि भूषण गवई यांनी पुढील आठवड्यात वाहनतळ आणि भुयारी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत केवळ वकिलांसाठी हे पार्किंग खुले राहील.
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने येथे ‘पे अँड पार्किंग’चा प्रस्ताव दिला होता. जिल्ह्यात कोणत्याही न्यायालयात ‘पे अँड पार्किंग’ नाही. कौटुंबिक समस्येने ग्रासलेले नागरिक येथे येत असतात. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयातच याबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्याने वकील नाराज झाले होते. त्याबाबतचे निवेदन दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने उच्च न्यायालयाला पाठविले होते. त्यानंतर पुणे जिल्हा बार असोसिएशनने कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरू करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. पार्किंग त्वरित सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील न्यायालयाच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, अनंत बदर आणि भूषण गवई यांची शनिवारी बैठक झाली. त्यामध्ये पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर, सचिव अ‍ॅड. विवेक भरगुडे आणि दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे यांना वाहनतळ आणि भुयारी मार्ग सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.

1 कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या उपस्थितीत १२ आॅगस्ट रोजी झाले. त्या वेळीच तेथील पार्किंग सुरू होणे अपेक्षित होते.
2उद्घाटन होऊन तीन महिने उलटल्यानंतरही येथील वाहनतळ सुरू झालेले नाही. त्याचा वकील, पक्षकारांना त्रास होत आहे. ते जवळच असणाºया शिवाजीनगर न्यायालयात वाहन लावतात. आधीच शिवाजीनगर न्यायालयातच वाहनतळासाठी अपुरी जागा आहे.
3त्यात कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज करणारे वकील, पक्षकारांच्या गाड्या लावण्यात येत आहेत. त्यामुळे येथे गर्दी होत आहे. पुणे जिल्हा बार असोसिएशन आणि दि पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशनकडून येथील वाहनतळ आणि भुयारी मार्ग सुरू करण्याची वारंवार मागणी करण्यात येत होती.

Web Title: Assurances to start the subway, for family court parking advocates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे