Appointed officer of State Bank on Yashwant Co-operative sugar Factory: order of Joint Director of Sugar | यशवंत सहकारी कारखान्यावर राज्य बँकेचा अधिकारी नियुक्त : साखर सहसंचालकांचा आदेश 
यशवंत सहकारी कारखान्यावर राज्य बँकेचा अधिकारी नियुक्त : साखर सहसंचालकांचा आदेश 

ठळक मुद्दे४५ कोटींची थकबाकी असल्याने नियंत्रण राज्य बँकेकडेआर्थिक अनियमिततेमुळे यशवंत कारखान्यावर २०११ साली प्रशासकाची नियुक्ती बँकेची कर्जवसुली सुलभरित्या होण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याची कारखान्यावर नियुक्ती होणे गरजेचे

पुुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अवसायकपदी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सहायक व्यवस्थापक पी. बी. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य बँक यशवंत कारखान्याची मुख्य पतपुरवठादार असल्याने, कर्ज वसुली करणे सोपे जावे यासाठी कारखान्याचे नियंत्रण बँकेकडे देण्यात आले आहे. आर्थिक अनियमिततेमुळे यशवंत कारखान्यावर २०११ साली प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आले. कारखाना सुरु करण्यासाठी कारखान्याची जमीन विकण्याचे देखील प्रयत्न झाले. मात्र, कारखाना सुरु करण्यात यश आले नाही. राज्य सहकारी बँक ही कारखान्याची मुख्य पतपुरवठादार आहे. बँकेचे सर्वाधिक ४४ कोटी ५३ लाख ७८ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे कारखान्याचे नियंत्रण राज्य बँकेकडे द्यावे अशी मागणी राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक सहसंचालक (साखर) संजयकुमार भोसले यांनी पी. बी. देशमुख यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. या पुर्वी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी. जे. देशमुख यांच्याकडे अवसायकाची जबाबदारी होती. यशवंत सहकारी कारखान्याचा संचित तोटा १३८ कोटी ४ लाख ७८ हजार रुपये इतका आहे. कारखाना २०११ पासून बंद आहे. कारखाना सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न करुनही त्यात यश आले नाही. राज्य बँकेचे साडेचव्वेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याची ११७ एकर जमीन विक्रीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, त्यास अजूनही प्रतिसाद मिळालेला नाही. बँकेचे थकीत कर्ज मोठ्या प्रमाणावर असून, त्यासाठी अनुत्पादक खात्याची (एनपीए) तरतूद राज्य बँकेस करावी लागली आहे. बँकेची कर्जवसुली सुलभरित्या होण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याची कारखान्यावर नियुक्ती होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या अधिकाऱ्याची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

----------------------
यशवंत सहकारी साखर कारखान्याला अवसायनात काढल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायलयात दोन याचिका दाखल असून, त्या पैकी एका याचिकेच्या सुनावनीत न्यायलयाने अंतरिम आदेश देत स्थिती आहे तशी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी कारखान्यावर बँकेच्या अधिकाºयाची नियुक्ती करुन कारखाना एकप्रकारे राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात देऊन टाकला आहे.अ‍ॅड. योगेश पांडे, प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना 


Web Title: Appointed officer of State Bank on Yashwant Co-operative sugar Factory: order of Joint Director of Sugar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.