Announcement of the State Board of Examination for Class 10-12th Schedule | राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर झाले. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा १७ ते ३० जुलै आणि बारावीची लेखी परीक्षा १७ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत घेतली जाईल. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलै दरम्यान होईल. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र, परीक्षेपूर्वी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये छापील स्वरूपातील दिलेले वेळापत्रक अंतिम असेल, असे मंडळाने स्पष्ट केले.


Web Title: Announcement of the State Board of Examination for Class 10-12th Schedule
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.