अमित भारद्वाजच्या पाच कंपन्या असल्याचे तपासात उघड : १५ कोटी रुपये हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:55 PM2018-05-02T20:55:50+5:302018-05-02T20:55:50+5:30

गेनबिटकॉईन मधील फसवणुकीची व्यापी लक्षात घेऊन सायबर सेलकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे़. या विशेष तपास पथकाने अमित भारद्वाजच्या भारतात पाच कंपन्या असल्याचे निष्पन्न केले आहे़.

Amit Bhardwaj's five companies in countrey, confirm in investigation, 15 crores collect | अमित भारद्वाजच्या पाच कंपन्या असल्याचे तपासात उघड : १५ कोटी रुपये हस्तगत

अमित भारद्वाजच्या पाच कंपन्या असल्याचे तपासात उघड : १५ कोटी रुपये हस्तगत

Next
ठळक मुद्देसायबर क्राईम सेल येथे आतापर्यंत ७३ साक्षीदारांची अंदाजे ७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर फरार आरोपींच्या शोधाकरिता सायबर विभागाकडील २ पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना

पुणे : बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुंतवणुक योजनेत गेन बिटकॉईन देऊन फसवणूक करणाऱ्या  मुख्य सुत्रधार अमित भारद्वाजच्या भारतात पाच कंपन्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारताबाहेर हॉंगकाँग, दुबईतील एकूण तीन कंपन्यांमध्ये त्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक केल्याचे उघड झाले आहे़. याप्रकरणात आतापर्यंत एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १५ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहे़. 
गेनबिटकॉईन मधील फसवणुकीची व्यापी लक्षात घेऊन सायबर सेलकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे़. या विशेष तपास पथकाने अमित भारद्वाजच्या भारतातील पाच कंपन्या असल्याचे निष्पन्न केले आहे़. त्यात एक्सनेए फॅसिलीटी मॅनेजमेंट प्रा़ लि़ , मायनर्स इंंडिया टेक्नोलॉजीज प्रा़ लि़ , नॉट्रॉन सेल्स प्रा़ लि़, रेडॉक्स इन्फोटेक प्रा़ लि़ , हॅन्स क्लाऊडिंग आयटी एलएलपी़, सॅबटेक्स सर्व्हिसेस (इंडिया) प्रा़ लि़, ग्रॅड वेडिंग सोल्युशन्स लि़ यांचा समावेश आहे़. याशिवाय भारताबाहेर अमेज मायनर्स प्रा़ लि़ हॉगकॉग, एबीसी मेगा अलाईन्स, दुबई, एबी फासिलिटी मॅनेजमेंट, दुबई या कंपन्यांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़. मात्र, त्याने आपला सर्व्हर नेमका कोठे ठेवला आहे़ याची माहिती तो पोलिसांना लागू देत नाही़.
अमित भारद्वाज याने गेनबिटकॉईन डॉट कॉम, गेनबिटकॉईन डॉट कॉम ही वेबसाईट तयार केली असून त्याद्वारे गुंतवणुक केलेल्याचे त्यावर रजिस्ट्रेशन करुन त्यांचे युजर आयडीवर आभासी बिटकॉईनचा परतावा मिळाला असल्याचे भासवत असत़. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर त्याने बिटकॉईन फसवणूक करुन त्याच्या कंपनीचे आयडीवर घेतलेले आहेत़. ही वेबसाइट भारद्वाजने बंद करुन फसवणूक केली आहे़. सध्या मुख्य आरोपींपैकी ५ आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडे तपास सुरु आहे़. 
यातील भारद्वाज याचे वडील व अन्य प्रमुख आरोपी फरार असून त्यांच्या शोधाकरिता सायबर विभागाकडील २ पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत़. याचा लाभ झाला असलेले प्रमुख फरार आरोपी हे दुबई येथे असल्याचे समजते़. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट व लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे़.
विशेष तपास पथकाने गेन बिटकॉईन गैरव्यवहारामधील गुन्ह्याचे तपासात नागरिकांना गेनबिटकॉईन एमएलएममध्ये गुंतवणुक करण्यास उद्युक्त करणाऱ्यांना आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे़ या आरोपींकडून २३७ बिटकॉईन, ९० इथेरियम व ३८़९३ लाख रुपये डी़ डी़ स्वरुपात असे एकूण अंदाजे १ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत़ 
सायबर क्राईम सेल येथे आतापर्यंत ७३ साक्षीदारांची अंदाजे ७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत़ गेनबिटकॉईन या कंपनीमार्फत कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सायबर क्राईम सेल येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले आहे़ 

Web Title: Amit Bhardwaj's five companies in countrey, confirm in investigation, 15 crores collect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.