लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अमरनाथ यात्रेवर झालेला अतिरेकी हल्ला आणि काश्मीरमधील सैन्यावर फुटीरतावाद्यांकडून दगडफेक याचा निषेध म्हणून पनुन काश्मीर संघटनेने टिळक चौकात आंदोलन केले. कश्मीर हिंदूस्तान का है, नही किसी के बाप का, हिंदूस्तान मे रहना है तो वंदे मातरंम का स्वीकार करो, अशा घोषणा देऊन आदोलकांनी सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेवर झालेला अतिरेकी हल्ला त्यामधील अतिरेक्यांना शिक्षा होयला पाहिजे. तसेच भारताच्या सीमेवर सतत रक्षण करणाऱ्या सैन्याला होणाऱ्या त्रासाविरुद्ध सरकारने सक्षम पाऊल उचलणे गरजेचे आहे. काश्मीरमध्ये होणारी मंदिराची लूट, स्त्रियांवरील अत्याचार, दंगल, दगडफेक यामुळे तेथे राहणारे भारतीय लोक घाबरून राहत आहेत. त्यासाठी सरकारने आपली संरक्षणव्यवस्था अजून वाढवली पाहिजे. आपण सर्व पुणेकर आणि भारतीय लोकांनी त्यांना आधार देण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये होणाऱ्या या अत्याचारावर सरकारची मदत मिळत आहे, पण काही वाईट लोक हे कृत्य करतात त्यांना आपण थांबवले पाहिजे, असे संघटनेने आवाहन केले आहे.
यावेळी संघटनेचे समन्वयक राहुल क ौल, तसेच पदाधिकारी रोहित काजरू, रोहित भट, संजय धार, सुनील रैना, मिलिंद धर्माधिकारी आदी उपस्थित होते.