सुपे परिसरात शैक्षणिक संकुल उभारणार - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:48 AM2018-10-02T00:48:51+5:302018-10-02T00:49:21+5:30

अजित पवार : दुष्काळसदृश परिस्थिती पाहणीबाबत गावभेट दौरा

Ajit Pawar to set up educational complex in Surepe area | सुपे परिसरात शैक्षणिक संकुल उभारणार - अजित पवार

सुपे परिसरात शैक्षणिक संकुल उभारणार - अजित पवार

Next

सुपे : सुपे परिसरातील मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी इतरत्र ठिकाणी फिरू लागू नये, तसेच शिक्षणापासून येथील कोणीही वंचित राहू नयेत, यासाठी येथे लवकरच शैक्षणिक संकुल उभारून दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्याचा मानस आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सुपे परिसरात सध्या दुष्काळ सदृशस्थिती असल्याने पवार यांनी गावभेट दौरा केला. या वेळी येथील ख्वाजा शाहमन्सूर दर्गा आवारातील सभागृहात झालेल्या बैठकीत पवार बोलत होते. पवार म्हणाले की, सध्याचे सरकार शेतकऱ्यांना नीट जगू देत नाही. पेट्रोल व डिझेल आणि गॅसच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. शेतकºयांच्या मालाला आधारभूत किंमत मिळत नाही. राज्यात दुष्काळ सदृशस्थिती असल्याने सरकारने रोहयोची कामे सुरू केली पाहिजे. मात्र, या सरकारला मेट्रो पाहिजे या शब्दात त्यांनी टीका केली. यावेळी सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, नीता बारवकर, सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच पल्लवी लोणकर, सोमेश्र्वरचे संचालक गणेश चांदगुडे, पोपट पानसरे, बी. के. हिरवे, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुप्यात दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्याचा मानस आहे. त्यासंदर्भात जागा निश्चित करून लवकरच शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. बाजार समितीच्या माध्यमातून सुप्यात लवकरच नवीन पेट्रोलपंप सुरु करण्यात येणार आहे. गरीब मुलांच्या हाताला त्यामुळे काम मिळणार आहे. खरेदी-विक्री संघाच्यावतीने सर्वसामान्यांच्या सोईसाठी येथे औषध दुकान सुरू करण्यात येणार आहे.’ परिसरातील शेतकºयांनी जूनच्या दरम्यान जनाईचे पैसे भरले पाहिजेत, त्यामुळे पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करता येईल.
- अजित पवार,

Web Title: Ajit Pawar to set up educational complex in Surepe area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.