नगरमध्ये आम्ही विखेंना हरवलंय, ती जागा राष्ट्रवादीच लढवणारः शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 03:29 PM2019-03-11T15:29:46+5:302019-03-11T15:30:57+5:30

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या पत्रकार परिषद घेत संभाव्य निवडणुकीच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

Ahmednagar's seat will be ours, election will be fought by NCP - Sharad Pawar | नगरमध्ये आम्ही विखेंना हरवलंय, ती जागा राष्ट्रवादीच लढवणारः शरद पवार

नगरमध्ये आम्ही विखेंना हरवलंय, ती जागा राष्ट्रवादीच लढवणारः शरद पवार

Next

पुणे : अहमदनगर मतदारसंघात यापूर्वी दिवंगत बाळासाहेब विखे यांचा पराभव आम्ही एकदा केलेला आहे हा दाखला देत हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा नकार दिला. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असून, आम्हीच लढणार असल्याचे ते म्हणाले.

सुजय विखे भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी अहमदनगरची जागा सोडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता पवार म्हणाले, ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैैकी दोन आमदार राष्ट्रवादीचे आहेत. उर्वरित मतदारसंघात राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. मतदारसंघात आमची ताकद असल्याने विखे यांच्यासाठी जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही.

लोकप्रियता व निवडून येण्याची क्षमता या कारणांमुळे सुजय विखे यांच्यासाठी जागा सोडली जाईल का? या प्रश्नावर ते म्हणाले, यापूर्वी विखे घराण्यातील बाळासाहेब विखे यांना आम्ही या मतदासंघातून पराभूत केलेले आहे. हा इतिहास सर्वांना माहित आहे. त्यावेळी विखे यांनी माझ्याविरोधात खटलाही भरला होता. मी निवडणुकीतून अपात्र होईल, अशी वेळ माझ्यावर आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात मला दिलासा मिळाला. त्यामुळे विखे यांना कुणी पराभूत करू शकत नाही, असे नाही.

Web Title: Ahmednagar's seat will be ours, election will be fought by NCP - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.