स्वातंत्र्यानंतरही विज्ञानापासून आपण लांबच; डॉ. जयंत नारळीकर यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:38 AM2018-08-20T02:38:44+5:302018-08-20T02:40:09+5:30

ज्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो त्याची योग्य तपासणी केली तर एकविसाव्या शतकात राहाणे जास्त सोयीचे होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

After independence, you are far away from science; Dr. Jayant Naralikar's letter | स्वातंत्र्यानंतरही विज्ञानापासून आपण लांबच; डॉ. जयंत नारळीकर यांची खंत

स्वातंत्र्यानंतरही विज्ञानापासून आपण लांबच; डॉ. जयंत नारळीकर यांची खंत

Next

पुणे : पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’मधून विज्ञानाची महती लोकांपर्यंत पोहोचवली. स्वातंत्र्यानंतर लोक विज्ञानाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील आणि त्यांच्यात एक निर्णयक्षमता निर्माण होईल. मात्र स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी वैज्ञानिक दृष्टिकोनापासून आपण लांबच आहोत, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली. ज्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो त्याची योग्य तपासणी केली तर एकविसाव्या शतकात राहाणे जास्त सोयीचे होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.
२० आॅगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा हौतात्म्य दिन या वर्षीपासून ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय आॅल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी घेतला आहे. त्याच्या पूर्वसंध्येला या दोन्हींसह लोकविज्ञान संघटना आणि सिम्बायोसिस स्कूल आॅफ लिबरल आटर््स या संघटनांच्या वतीने ‘वैज्ञानिक दृष्टिकोन कशासाठी?’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘२१ व्या शतकात जगायला शिकताना’ या विषयावर ते बोलत होते.
याप्रसंगी मुक्ता दाभोलकर, डॉ. विवेक माँटेरो आणि डॉ. सत्यजित रथ उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले ही समाधानाची गोष्ट आहे. लवकरच संपूर्ण कट उघडकीस येईल अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. नारळीकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी केली. ते म्हणाले, आज आसपासची स्थिती पाहातो तेव्हा असे वाटते, की अजूनही लोक १८ व १९व्या शतकातून बाहेर आलेले नाहीत. एकविसाव्या शतकात म्हणतो तेव्हा खासियत काय? विज्ञानाने अनेक गोष्टीत प्रगती केली. त्याचे पडसाद तंत्रज्ञानात उमटले. मात्र ज्या वेळी विज्ञानामधून तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानामधून विज्ञानात जातो तेव्हा सगळे विज्ञानाचे शोध कल्याणकारी असतातच असे नाही. त्याचे दुष्परिणाम असू शकतात. विज्ञानाचा योग्य वापर करतो की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. दाभोलकर यांना माहिती होते की जुन्या विचारसरणीला नवीन प्रवाहात आणले पाहिजे. जी माहिती आपल्याला आहे ती कधीतरी अपुरीदेखील असू शकते त्यासाठी एखादी गोष्ट तपासून घेता आली पाहिजे. आपण कुठली गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून न तपासता अंधश्रद्धेच्या आहारी जातो. ही खरच अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे? लोकांना मदत करणे ही श्रद्धा असू शकते मात्र दोन्हीमध्ये काय तथ्य आहे याची तपासणी करावी. विश्वास ठेवणाऱ्या गोष्टींची तपासणी केली तर एकविसाव्या शतकात राहणे जास्त सोयीचे होईल.
डॉ. सत्यजित रथ ‘परंपरा आणि नवता : एक वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर बोलताना म्हणाले, सामान्य माणसाचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक नसतो. राज्यघटनेने हे गाठोडं लोकांच्या डोक्यावर दिले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन मनुष्यत्वाचे व्यवच्छेदक लक्षण असेल तर आपण ते का हरवून बसलो आहोत हा प्रश्न आहे.

वैैज्ञानिक दृष्टिकोन शोषणमुक्तीचा मार्ग
मुक्ता दाभोलकर यांनी ‘शोषणरहित समाजासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर विचार व्यक्त केले. शास्त्रज्ञ किंवा विज्ञानाच्या विषयावर काम करणाºया व्यक्तींना माहिती आहे की प्रश्न उपस्थित करताना हिंसा शोषण होऊ शकते, तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन हाच शोषणमुक्तीचा मार्ग आहे आणि त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मुलांच्या मनात आज प्रश्न निर्माण होत आहेत आणि ते त्याची पडताळणी करीत आहेत. त्यांच्या अनुभविश्वाला भिडले पाहिजे तरच शोषणरहित समाज निर्माण होऊ शकतो. आयुष्यात निर्णय घेताना तर्क वापरता आले पाहिजेत. वैज्ञानिक दृष्टिकोनापासून शोषणविरहित समाजाकडे वाटचाल केली तर हिंसेला तोंड द्यावे लागणे हे आव्हान आहे. यासाठी माणसांनी एकमेकांचा आदर करून हात दिला पाहिजे.

Web Title: After independence, you are far away from science; Dr. Jayant Naralikar's letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.