पुण्यात वारजे येथे टायर फुटल्याने डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 11:55 AM2019-05-15T11:55:14+5:302019-05-15T19:11:17+5:30

वारजे येथे मुंबई- पुणे द्रुतगती हायवेवर रसिकलाल धारिवाल कॉलेजसमोर डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरचे टायर फुटल्याने बुधवारी सकाळी तो पलटी झाला.

accident of diesel transport tanker Due to tyres blast in Pune | पुण्यात वारजे येथे टायर फुटल्याने डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी

पुण्यात वारजे येथे टायर फुटल्याने डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी

Next

पुणे: वारजे येथे मुंबई- पुणे द्रुतगती हायवेवर रसिकलाल धारिवाल कॉलेजसमोर डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरचे टायर फुटल्याने बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो पलटी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. टँकर पलटी झाल्यामुळे एक ते दीड किलीमीटरपर्यंत पाण्यासारखे डिझेल वाहत होते. रस्त्यावर डिझेल सांडल्यामुळे काही दुचाकींना तेथे अपघात घडला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , या टँकरमध्ये साधारण २२००० लिटर टँकर असण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर तिथे काही वेळ बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परंतु, पोलीस व अग्निशामक दल यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रणात आली. नियत्रंण सुटल्याने डिझेल आणि पेट्रोल टॅकर हायवेवर पलटी
कर्वेनगर: आज सकाळी ९ वाजता कात्रज देहुरोड महामार्गवर मुबंई कडून येणारा टॅकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि वारजे आर एम डी कॉलेज समोरील अगदी वळणावर हा बाराचाकी टॅकर हायवेवरिल लोखंडी बार तोडुन सर्व्हिस रस्तावर येऊण पटली झाला. चालक अमरबहाद्दुर संतराम यादव (वय २९) हा किरकोळ जखमी झाला आहे या टॅकर मध्ये साधारण २२ हजार लिटर डिझेल आणि पेट्रोल भरले होते
वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी घटना घडली त्या वेळी या टॅकरमधील अर्धे पेट्रोल आणि अर्धे डिझेल होते टॅकर पलटी झाला आणि रस्त्यावर पाण्यासारखे डिझेलचे पाट वाहताना दिसत होते त्यामुळे काही अघटीत घडले तर मोठ्या प्रमाणात जीवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती रस्ताजवळील सोसायट्या मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. टॅकर पलटी झाल्यावर आर एम डि कॉलेज पासुन वारजे जवळील पॉप्युलर पर्यंत साधारण एक किलोमीटर पर्यत अंतरावर डिझेल वाहत आले होते
या वेळी अग्निशामक दलाचे सेशन ड्युटी आॅफिसर गजानन पथ्रुरकर यांनी सर्व परिस्थिती संभाळत पालिके कडुन दोन जेसीबी आणि दोन मातीचे टॅकर मागवले होते त्यामुळे वाहनारे डिझेल पेट्रोल रस्तावर ठिकठिकाणी खड्डे करित इंधन जमिनीमध्ये जिरवण्यासाठी प्रयत्न केले तसेच वाहणाऱ्या डिझेल वर माती टाकुन घसरडे रस्ते व्यवस्थित केले वाहणाºया इंधनावर फोरमचा फवाºयांचा वापर केला. त्यामुळे कोठे ठिणगी  पडली तर आग पसरणार नाही यांची पुरेपूर काळजी अग्निशामक दल घेत होते.
चौकट 
वाहणाऱ्या डिझेल वर वाहतूक पोलिस कर्मचारी देखरेख करत सावधगिरी बाळगण्याची आवाहन करत होते. डिझेलमुळे रस्ते घसरडे झाले होते. वाहने घसरुन अपघात वाढत होते तर अपघातांना मदत करण्याच्या ऐवजी किंवा पोलिसांना सहकार्य करण्या ऐवजी काही नागरिक डिझेल पळविण्यात व्यस्त होते अगदि मोठी बॅरल भरुन डिझेल घेताना दिसत होते.
अखेर वाहतुक पोलिसानी क्रेन मागवुन बारा वाजता टॅकर रस्तावर उभा केल्यानंतर  मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची कसोटीच झाली होती पण एक तासा नतंर वाहतुक व्यवस्थित झाली आहे. सबंधित घटणे बाबत वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर करत आहे.
 

Web Title: accident of diesel transport tanker Due to tyres blast in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.