Accelerated two cars accident near fresh petrol pump; Two killed | द्रुतगतीवर ताजे पेट्रोलपंपाजवळ दोन कारचा अपघात; दोन ठार

लोणावळा :  मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत जवळील ताजे पेट्रोलपंपाजवळ आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन कारच्या भीषण धडकेत एका व्यक्तीसह नऊ महिन्याच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला तर एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत.

सुमित जमपाल रोचलानी (वय 28 रा. उल्हासनगर) व ह्रतीका सुमित रोचलानी (वय 9 महिने) अशी मृतांची नावे आहेत. तर वीणा ज्ञानचंद रोचलानी (वय 48), क्रिशा सुमित रोसलानी (वय 20) रवी तुळशीदास रोचलानी (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताजे पेट्रोल पंपाजवळील फुडमॉल येथिल सर्व्हिस रस्त्याने मुंबईच्या दिशेने येत असलेली इर्टिगा कार क्र. (एमएच 47 के 4459) हिला मागून वेगात आलेली स्विफ्ट कार क्र. (एमएच 05 सीएम 1215) ची जोरात धडक बसली.

यामध्ये दोन्ही कार रस्त्याच्या कडेला पटली झाल्या. दोन्ही कारचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचाराकरिता निगडी येथिल लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढिल तपास कामशेत पोलीस करत आहेत.