७५ वर्षांच्या आजींचा पराक्रम : एका दिवसात सर केला हरिश्चंद्रगड 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:44 PM2019-01-25T15:44:47+5:302019-01-25T15:48:06+5:30

७५ वर्षांच्या आज्जींनी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक उंचीचा हरिश्चंद्रगड सर केला आहे आणि तोही एका दिवसात! 

75 Years old granddaughter climb Harishchandragad fort in one day | ७५ वर्षांच्या आजींचा पराक्रम : एका दिवसात सर केला हरिश्चंद्रगड 

७५ वर्षांच्या आजींचा पराक्रम : एका दिवसात सर केला हरिश्चंद्रगड 

googlenewsNext

पुणे :आवड असेल तर सवड मिळते, असं म्हणतात. त्याचबरोबर उत्साह असेल तर म्हातारपणातही तुम्ही थेट गिर्यारोहक बनू शकता, असे म्हणता येईल. हो त्याला कारणही तसेच आहे. कारण तब्बल ७५ वर्षांच्या आज्जींनी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक उंचीचा हरिश्चंद्रगड सर केला आहे आणि तोही एका दिवसात! 

             हिराबाई दत्तात्रय शिंदे असे या साहसी आजींचे नाव आहे. पिंपळवंडी (ता. जुन्नर) या गावातील हिराबाई यांचा नातू निखिल हा गिर्यारोहक असून राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची तो नेहमीच भ्रमंती करत असतो. घरी आल्यानंतर तेथील साहसी अनुभवही सांगतो. त्याच्या त्या सांगण्यातून आजी हिराबाई यांनाही एखादा तरी डोंगर सर करावा, अशी इच्छा झाली. म्हणतात ना ‘इच्छा तेथे मार्ग’ त्यामुळे त्यांची उत्कट इच्छा त्यांच्या नातवानेही मनावर घेतली आणि आजींच्या गिर्यारोहणाची तयारी सुरू झाली. गिर्यारोहणासाठी आज्जींनी काही दिवस चालण्याचा सराव केला. नातवाच्या मार्गदर्शनाखालीहलका व्यायाम सुरू केला आणि स्टॅमिना तयार झाल्यावर थेट हरिश्चंद्रगड सर करायचा निश्चय झाला.शंकरभक्त व पिंपळेश्वर मंदिराच्या पुजारी असलेल्या हिराबाई शिंदे त्यांच्या नातवासोबत  हरिश्चंद्रगड सर करण्यासाठी तयार झाल्या. आर्श्चयाची बाब म्हणजे त्यांनी तरुण तुर्क नातवाच्या बरोबरीने एका दिवसात गडावरील सर्वोच्च उंचीचे तारामती शिखर गाठलेही.

रात्रीच्या अंधारातील चकवा आणि परतीचा थरार...

दिवसा लख्ख प्रकाशात अतिशय उत्साहात आजी हिराबाई यांनी गड सर केला खरा. मात्र, परतीच्या प्रवासात घळईमार्गे गड उतरताना अंधार झाला. त्यामुळे गडावरील पाऊलवाटेवरून येताना अनेक फाटे फुटताना त्यांना नेमका मार्ग सापडेना व दोघेही वाट चुकले. तासाभरानंतरही त्यांनी निखिल यांनी त्या परिसरातील मित्रांना फोनवर संपर्क केला. त्यानंतर रात्रीच्या वेळी गडाच्या पायथ्याशी असलेले असलेले चिंतामण कवठे हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांना घेऊन त्यांना शोधण्यासाठी गडावर गेले आणि रात्रीच्या अंधारात त्या दोघांनाही त्यांनी सुखरूप गडाखाली आणले.

Web Title: 75 Years old granddaughter climb Harishchandragad fort in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.