सभासदांच्या डोक्यावर ७० कोटींचा बोजा, माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:21 AM2018-08-12T00:21:59+5:302018-08-12T00:22:22+5:30

माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ करण्याची आवश्यकता नव्हती. तरीदेखील ही मंडळी जवळपास १५० कोटी रुपये खर्च करीत आहेत. गेल्या वार्षिक सभेत अध्यक्ष आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी स्वभांडवलातून विस्तारवाढ करणार असल्याचे खोटे सांगितले.

70 crores of burden on the heads of members | सभासदांच्या डोक्यावर ७० कोटींचा बोजा, माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीचा आरोप

सभासदांच्या डोक्यावर ७० कोटींचा बोजा, माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीचा आरोप

Next

बारामती - माळेगाव कारखान्याची विस्तारवाढ करण्याची आवश्यकता नव्हती. तरीदेखील ही मंडळी जवळपास १५० कोटी रुपये खर्च करीत आहेत. गेल्या वार्षिक सभेत अध्यक्ष आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी स्वभांडवलातून विस्तारवाढ करणार असल्याचे खोटे सांगितले. खोटे सांगून दिशाभुल करून आम्हा सभासदांच्या डोक्यावर सुमारे ७० कोटींचा बोजा कशासाठी ठेवला, असा सवाल माळेगाव कारखाना सभासद बचाव कृती समितीने केला आहे.
यासंदर्भात कृती समितीच्या वतीने कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, जिल्हा बँकेचे संचालक मदनराव देवकाते, तानाजीराव कोकरे, अ‍ॅड. एस. एन. जगताप, अनिल जगताप, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, विठ्ठलराव देवकाते आदींनी पत्रकार परिषदेत बोलताना ‘माळेगाव’च्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
माळेगाव कारखाना गेली कित्येक वर्षे कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर सभासदांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी, तसेच सभासदांना लागवडीच्या पूर्वमशागतीसाठी कांडेबिल देत आला आहे. परंतु या सत्ताधारी संचालक मंडळ ही परंपरा मोडीत काढून सभासदांच्या पैशांचा दुसºया कारणासाठी वापर करीत आहे. सत्ताधारी संचालक मंडळ हे गावोगावी फिरून आमच्याकडे पैसे शिल्लक असल्याचे सांगत आहेत, तर मग सभासदांची अडचण लक्षात घेउन कांडेबिल व दुसरा अ‍ॅडव्हान्स का देत नाही? यासाठी आम्ही सत्ताधारी संचालकांकडे वेळोवळी लेखी व तोंडी स्वरुपात मागणी केली आहे. परंतु त्याची दखलही घेतली गेली नाही.
कारखान्याच्या कार्यालयातील शेतकºयांनी सभासद होण्यासाठी अर्ज दिल्यानंतर तो प्रत्येक अर्ज संचालक मंडळाच्या मासिक मिटींगमध्ये अजेंड्यावर विषय घेऊन त्यांना सभासद करून घेतले जात होते. परंतु येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी संचालक मंडळ हे नवीन सभासद करून घेत नाही. ही परंपरा सत्तारुढ संचालक मंडळाने मोडीत काढली आहे. आम्ही संचालकांनी प्रत्येक मीटिंगमध्ये वेळोवेळी आवाज उठवला. परंतु त्याची दखल घेतली जात नाही.
सत्ताधारी संचालक मंडळ हे कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी फिरून आम्ही कारखान्याची विस्तारवाढ केली असून प्रतिदिनी साडेसात ते आठ हजार टनाने गाळप करणार आहोत, असे सांगत आहेत. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांतील गळीत हंगाम पाहता सभासदांचा ऊस प्रथम गाळपाला घेण्याऐवजी गेटकेनला प्राधान्य देऊन सभासदांच्या उसाचे चिपाडे करून त्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे उद्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर सभासदांचा आडसाली ऊस संपल्यानंतरच गेटकेनला प्राधान्य द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे मदनराव देवकाते यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, संजय देवकाते आदी उपस्थित होते.

ज्येष्ठांसाठी कारखान्याची गाडी, ड्रायव्हर देण्याची काय गरज?

माळेगाव कारखान्यात ज्येष्ठांना नेण्या-आणण्यासाठी गाडी, ड्रायव्हर देण्यात येतो, असा आरोप योगेश जगताप यांनी केला आहे, हे चुकीचे आहे. ज्येष्ठांसाठी कारखान्याची गाडी, ड्रायव्हर देण्याची काय गरज आहे.
भ्रष्टाचार करण्यासाठी पैसे खाण्याची गरज नाही. वागण्यातूनदेखील भ्रष्टाचार होऊ शकतो, असे जगताप म्हणाले.

सोमवार (दि. १३) पासून माळेगाव कारखाना शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने या पार्श्वभूमीवर सभासद संपर्क दौºयाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा दौरा १० दिवस २२ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. यादरम्यान माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ३० गावांमध्ये दौरा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सत्तारूढ संचालक मंडळाच्या साखर विक्रीच्या चुकीच्या धोरणामुळे कारखान्याला तोटा सहन करण्याची वेळ आली. तो तोटा पर्यायाने सभासदांचा झाल्याचे बाळासाहेब तावरे यांनी सांगितले. शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलाचा दर्जा ढासळल्याचा मुद्दा प्रचारात सत्ताधाºयांनी केला होता. तेच विद्यमान अध्यक्ष व मार्गदर्शक यांनी तीन वर्षांत काहीही सुधारणा केलेली नसून इंग्लिश मीडियम शाळेतील तक्रारी वाढल्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Web Title: 70 crores of burden on the heads of members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.