बँक आॅफ महाराष्ट्राच्या अध्यक्षांसह ६ अधिकाऱ्यांना २७ जून पर्यंत पोलीस कोठडी, डीएसके गैरव्यवहार प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 07:20 PM2018-06-20T19:20:53+5:302018-06-20T19:20:53+5:30

बँकेच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेडीएल या कंपनीशी संगनमत करुन त्यांच्या अधिकार व अधिकारांचा दुरुपयोग केला़.

6 officers including Bank of Maharashtra President in police custody till 27th June, DSK fraud case | बँक आॅफ महाराष्ट्राच्या अध्यक्षांसह ६ अधिकाऱ्यांना २७ जून पर्यंत पोलीस कोठडी, डीएसके गैरव्यवहार प्रकरण

बँक आॅफ महाराष्ट्राच्या अध्यक्षांसह ६ अधिकाऱ्यांना २७ जून पर्यंत पोलीस कोठडी, डीएसके गैरव्यवहार प्रकरण

Next
ठळक मुद्देडीएसकेएल या कंपनीने सोलापूर रोडला ड्रिम सिटी प्रकल्पासाठी जमिनी खरेदी करण्यास मार्च २००७ पासून सुरुवातवेगवेगळ्या पार्टनरशिप फर्म स्थापन करुन व अस्तित्वात असलेल्या दोन अशा आठ फर्मद्वारे १०८३ कोटी जमा

पुणे: बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी गैरव्यवहार व पदाचा गैरवापराचा ठपका ठेवत अटक करण्यात आलेल्या बँक आॅफ महाराष्ट्राच्या अध्यक्षांसह सहा अधिकाऱ्यांना आरोपींना गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांनी बुधवारी (दि.२०जून ) अटक केली. या सर्व आरोपींना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या सर्व अधिकाऱ्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. 
 याप्रकरणी बँक आॅफ महाराष्ट्राच्या अध्यक्ष रविंद्र मराठे यांच्यासह राजेंद्रकुमार वेदप्रकाश गुप्ता, एस.एम.घाटपांडे , राजीव नेवासकर, सुशिल मुहनोत आणि नित्यानंद देशपांडे अशी पोलीस कोठडी ठोठावलेल्या आरोपी अधिकाऱ्यांची नावे आहे. जितेंद्र नारायण मुळेकर (वय.६५ वर्ष, कोथरुड ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डी़. एस़. कुलकर्णी यांच्या डीएसकेएल या कंपनीने सोलापूर रोडला ड्रिम सिटी प्रकल्पासाठी जमिनी खरेदी करण्यास मार्च २००७ पासून सुरुवात केली होती़. बँकेच्या अधिकाऱ्यांनी डीएसकेडीएल या कंपनीशी संगनमत करुन त्यांच्या अधिकार व अधिकारांचा दुरुपयोग केला़. गैरवापर व गैरव्यवहार करुन कंपनीला कर्ज मंजूर केले, असा ठपका ठेवून त्यांना आज आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़. तसेच डी़ एस़ कुलकणी आणि हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने जवळपास ३७ हजार पानी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे़. 
 सरकारी वकील युक्तिवाद करताना म्हणाले, या गैरव्यवहारात अजून कुणी बँक कर्मचाऱ्यांचा समानवेश आहे का? तसेच वेगवेगळ्या पार्टनरशिप फर्म स्थापन करुन व अस्तित्वात असलेल्या दोन अशा आठ फर्मद्वारे १०८३ कोटी जमा करण्यात आले . यासर्वांमध्ये घाटपांडे यांची भूमिका काय, एन.सी.डी. (नॉन कर्न्व्हटेबल डिबेंचर ) च्या पैशांचा विनियोग योग्य व त्याच उद्दिष्टासाठी झालेला नसताना घाटपांडे यांनी कोणाच्या सांगण्यावरुन खोटा दाखला तयार करत तो खरा असल्याचे दाखविले याचा  सखोल तपास करावयाचा आहे, बँक आॅफ महाराष्ट्र, स्टेट बँक आॅफ इंडिया, विजया बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक, आय.डी.बी.आय या बँकांसह इतर बँकांनी दिलेल्या कर्जाच्या नावाखाली पैशांचा विनियोग दाखले वस्तुस्थिती दर्शक नसून खोटे असून ते घाटपांडे यांनी तयार केले असून त्यात सदरचे आरोपी मराठे , गुप्ता, देशपांडे, मुहनोत यांची यात भूमिका काय होती या सर्व गोष्टींचा उलगडा करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी. ही मागणी ग्राह्य धरताना न्यायालयाने आरोपींना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. 

Web Title: 6 officers including Bank of Maharashtra President in police custody till 27th June, DSK fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.